Lockdown 5.0: जूनमध्ये इतक्या दिवस बंद राहतील ‘बँका’, इथं पहा Bank Holiday ची संपूर्ण यादी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना विषाणू साथीचा प्रसार रोखण्यासाठी बहुतांश राज्यांनी लॉकडाउन-5 ला 1 जून ते 30 जून पर्यंत वाढविले आहे. मात्र आजपासून देशात 30 जूनपर्यंत अनलॉक -1 लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या चार टप्प्यांनंतर देशात आता अनलॉक-1 चे मार्गदर्शक तत्त्वे लागू झाली आहेत. त्याअंतर्गत देशभरात अनेक प्रकारची सूट देण्यात आली आहे. जर आपले बँकांशी संबंधित कामे अडकली असतील तर ते आपण पूर्ण करू शकता. परंतु घर सोडण्यापूर्वी हे माहित असणे आवश्यक आहे की जूनमध्ये बँका कोणत्या दिवशी बंद असतील. एकदा बँकेच्या सुट्या कळल्या की आपण बँकेत जाण्याची योजना करू शकता. जूनमध्ये बँका कधी बंद होतील ते जाणून घेऊया.

रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या यादीनुसार, रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार वगळता जूनमध्ये बँका 7 दिवस बंद राहतील. जूनमध्ये 7, 13, 14, 17, 23, 24 आणि 30 जून रोजी शनिवार व रविवार असल्याने सुट्टी असेल. याशिवाय 18 जून रोजी गुरु हरगोविंद जी जयंतीनिमित्त अनेक राज्यांत सुट्टी असेल.

जुलै आणि ऑगस्टमध्ये बँका कधी बंद असतील?

जुलै :  5, 11, 12, 19, 25 आणि 26 जुलै रोजी शनिवार व रविवार असल्याने सुट्टी असेल. यासह, बकरी ईद निमित्त 31 जुलै रोजी राजपत्रित सुट्टी असेल.

ऑगस्ट :  2, 8, 9, 16, 22, 23, 29 आणि 30 ऑगस्ट ला शनिवार आणि रविवार असल्याने सुट्टी असेल. रक्षाबंधनमुळे 03 ऑगस्टला सुट्टी आहे, 11 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त स्थानिक सुट्टी आहे, 12 ऑगस्ट म्हणजे श्री कृष्ण जन्माष्टमीमुळे राजपत्रित सुट्टी असेल, तसेच 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाची सुट्टी, 21 ऑगस्ट तीज (हरितालिका) मुळे स्थानिक सुट्टी, 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्त स्थानिक सुट्टी असेल. तर 30 ऑगस्टला मोहरममुळे राजपत्रित सुट्टी आहे, तसेच 31 ऑगस्टला ओणमची स्थानिक सुट्टी असेल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) सुट्टीच्या यादीनुसार 3 महिन्यांत रक्षाबंधन, जन्माष्टमी, बकरी ईद यासारख्या सुट्टींचा समावेश आहे. यावेळी, खातेदारांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच या तारखांविषयी आपल्याला माहिती असणे फार महत्वाचे आहे जेणेकरून आपण वेळेपूर्वी आपले काम पूर्ण करू शकाल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like