Bank Holiday 2020 : आगामी 3 महिन्यांत बँका 30 दिवस ‘बंद’, इथं पहा सुट्टींची संपूर्ण यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमध्ये अनेकांनी दुकाने व कार्यालये बंद केली असली तरी बँका सातत्याने सुरू होत आहेत. तथापि बँका सुरू व बंद करण्याच्या वेळेत थोडा बदल झाला आहे. परंतु बँक कर्मचारी संपूर्ण लॉकडाऊनमध्ये काम करताना दिसले. बँक सुट्टीबद्दल बघितले तर पुढील तीन महिन्यांत म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये बँका 30 दिवस बंद राहतील. यामध्ये रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार यांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) सुट्टीच्या यादीनुसार 3 महिन्यांत रक्षाबंधन, जन्माष्टमी, बकरी ईद यासारख्या सुट्टींचा समावेश आहे. यावेळी, खातेदारांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच या तारखांविषयी आपल्याला माहिती असणे फार महत्वाचे आहे जेणेकरून आपण वेळेपूर्वी आपले काम पूर्ण करू शकाल. जून 2020 ते ऑगस्ट 2020 पर्यंत कोणत्या दिवस बँका बंद राहतील ते जाणून घेऊया…

कोणत्या तारखेला का आहे बँकेची सुट्टी ?

जून – 7, 13, 14, 17, 23, 24 आणि 31 जूनला शनिवार व रविवार असल्याने सुट्टी असेल. याशिवाय 18 जून रोजी गुरु हरगोविंद जी जयंती निमित्त अनेक राज्यांत सुट्टी असेल.

जुलै – 5, 11, 12, 19, 25 आणि 26 जुलैला शनिवार व रविवार असल्याने सुट्टी असेल. यासह, 31 जुलै रोजी बकरी ईद असल्याने राजपत्रित सुट्टी असेल.

ऑगस्ट – 2, 8, 9, 16, 22, 23, 29 आणि 30 ऑगस्ट ला शनिवार आणि रविवार असल्याने सुट्टी असेल. रक्षाबंधनमुळे 03 ऑगस्टला सुट्टी आहे, तर 11 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीमुळे स्थानिक सुट्टी आहे, 12 ऑगस्ट म्हणजे श्री कृष्ण जन्माष्टमीमुळे राजपत्रित सुट्टी असेल, तसेच 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाची सुट्टी, 21 ऑगस्ट तीज (हरितालिका) मुळे स्थानिक सुट्टी, 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्त स्थानिक सुट्टी असेल. तर 30 ऑगस्टला मोहरममुळे राजपत्रित सुट्टी आहे, तसेच 31 ऑगस्टला ओणमची स्थानिक सुट्टी असेल.