बँकेचे व्यवहार लवरकच घ्या आटोपून ! कारण मार्चमध्ये तब्बल 13 दिवस बँका राहतील बंद

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कामकाजाचे एक कॅलेंडर जारी केले आहे. त्यानुसार, मार्च महिन्यात काही दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये 5 सुट्ट्यांचा समावेशही आहे. त्यामुळे या महिन्यात बँका तब्बल 11 दिवस बंद राहणार आहेत. याशिवाय 9 सरकारी बँक युनियन्सने 15 आणि 16 मार्च या दोन दिवशी संपावर जाण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार बँका तब्बल 13 दिवस बंद राहणार आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) एक कॅलेंडरनुसार, मार्च महिन्यातील काही दिवस बँकिंग व्यवहार बंद असतील. यामध्ये 5 दिवस सुट्ट्यांचा समावेश आहे. तर 4 रविवार आणि 2 शनिवारही बँका बंद राहणार आहेत. तसेच बँकांच्या खाजगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी बँक संघटनांनी 15 आणि 16 मार्चला संपावर जाण्याची घोषणा केली. याप्रकारे एकूण 13 दिवस बँकांचे कामकाज बंद असेल.

– 5 मार्च – मिझोराममध्ये Chapchar Kut निमित्ताने बंद राहतील बँका. हा बंद मिझोरामच्या नागरिकांसाठी असणार आहे.

– 11 मार्च – महाशिवरात्री पर्व.

– 13 मार्च – दुसरा शनिवार.

– 15 आणि 16 मार्च – सरकारी बँकांचा संप

– 22 मार्च – ‘बिहार डे’. पूर्ण बिहारमध्ये बँकिंग सेवा बंद

– 27 मार्च – चौथा शनिवार.

– 29 मार्च – होळी

– 30 मार्च – काही शहरांत होळीनिमित्त सुट्टी

याशिवाय, 7,14,21 आणि 28 मार्च या दिवशी रविवार आला आहे. त्यामुळे या चारही दिवशी बँका बंद राहणार आहेत.