
Bank Holidays | जुलैमध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, तपासून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची पूर्ण यादी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bank Holidays | देशातील मोठ्या लोकसंख्येचा अजूनही बँकेत जाऊन आर्थिक कामांचा निपटारा करण्यावर विश्वास आहे आणि इतर अनेक कामे ऑनलाइन न झाल्यास ग्राहकांना बँकेत जावे लागते. त्यामुळे बँकांच्या सुट्ट्यांची (Bank Holidays) माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे.
जुलै 2022 मध्ये, 14 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही, म्हणजे सुमारे अर्धा महिना बँका बंद (Bank holidays in july 2022) राहतील. अशा स्थितीत तुम्हालाही बँकेत काही काम असेल तर बँकांमधील सुट्ट्याची माहिती जरूर घ्या.
ज्या दिवशी तुम्ही बँकेत जाऊन तुमचे आवश्यक काम उरकण्याचे नियोजन केले असेल, त्याच दिवशी बँक बंद असेल, असे होऊ नये.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की जुलैमध्ये देशभरातील सर्व बँका 14 दिवस बंद राहणार नाहीत. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने ठरवलेल्या काही सुट्ट्या प्रादेशिक असतात. (Bank Holidays)
वेगवेगळ्या राज्यांच्या सुट्ट्यांची यादीही वेगळी असते. या सुट्ट्या सण किंवा विशेष प्रसंगी अवलंबून असतात. याचा अर्थ या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू नसून संबंधित राज्यांतील सण किंवा दिवसावर अवलंबून असतात.
त्यामुळे काही विशेष दिवशी फक्त काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील, परंतु इतर राज्यांमध्ये सर्व बँकिंग कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील.
आरबीआय जारी करते हॉलीडे कॅलेंडर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी बँक हॉलिडे कॅलेंडर जारी करते, ज्यामध्ये प्रत्येक राज्यात येणार्या बँक सुट्ट्यांची माहिती असते. या कॅलेंडरमध्ये ज्या बँकांच्या शाखा राज्यांमध्ये विशेष तारखांना बंद राहतील त्याबद्दल सांगण्यात आले आहे.
प्रत्येक दुसर्या आणि चौथ्या शनिवारी आणि सर्व रविवारी देशभरात बँका बंद असतात. याशिवाय राजपत्रित सुट्टीच्या दिवशीही सर्व बँकांना सुट्टी असते.
जुलै 2022 मध्ये बँकांच्या सुट्ट्यांची यादी
1 जुलै : कांग (रथजत्रा) / रथयात्रा – भुवनेश्वर आणि इंफाळमध्ये बँका बंद राहतील.
3 जुलै : रविवार (साप्ताहिक सुट्टी).
7 जुलै : खारची पूजा – आगरतळ्यात बँका बंद राहणार आहेत.
9 जुलै : शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), ईद – उल – अधा (बकरीईद)
10 जुलै : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
11 जुलै : जम्मू आणि श्रीनगरमध्ये एझ – उल – अझा – बँका बंद राहतील.
13 जुलै : भानू जयंती – गंगटोकमध्ये बँका बंद राहतील.
14 जुलै : बेन डिएनखलाम – शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
16 जुलै : हरेला – डेहराडूनमध्ये बँका बंद राहतील.
17 जुलै : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
23 जुलै : शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
24 जुलै : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
26 जुलै : केर पूजा – आगरतळामध्ये बँका बंद राहतील.
31 जुलै : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update