Bank Holidays | सप्टेंबरमध्ये 12 दिवस होणार नाही बँकांचे कामकाज, पहा सुट्ट्यांची पूर्ण यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Holidays | पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये विविध ठिकाणी बँका जवळपास 12 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्हालाही पुढच्या महिन्यात बँकेत जाऊन काही महत्त्वाचे काम करायचे असेल, तर बँकेच्या सुट्ट्यांची (Bank Holidays) यादी नक्की पहा. अन्यथा, ज्या दिवशी तुम्ही शाखेत जाल त्यादिवशी बँकेला सुट्टी असेल तर तुम्हाला विनाकाम परतावे लागेल. (Bank Holidays)

 

रिझर्व्ह बँक प्रत्येक कॅलेंडर वर्षात बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी करते. यातील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय स्तराच्या असतात. त्या दिवशी देशभर बँकिंग सेवा बंद असतात. त्याच वेळी, काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तराच्या असतात. त्या दिवशी बँकेच्या शाखा फक्त संबंधीत राज्यांमध्येच बंद असतात. वेगवेगळ्या राज्यांसाठी सुट्ट्यांची यादीही वेगळी असते.

3 प्रकारच्या असतात सुट्ट्या
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार बँकांमधील सुट्ट्यांची यादी तीन प्रकारच्या सुट्ट्यांच्या आधारे तयार केली जाते. पहिली म्हणजे Holiday under Negotiable Instruments Act, दुसरी Holiday under Negotiable Instruments Act and Real-Time Gross Settlement Holiday आणि तिसरी म्हणजे Banks’ Closing of Accounts.

सप्टेंबरमधील सुट्टीची यादी
1 सप्टेंबर 2022 – गणेश चतुर्थीनिमित्त बँकेला सुट्टी असेल.
4 सप्टेंबर 2022 – रविवारची साप्ताहिक सुट्टी.
6 सप्टेंबर 2022 – झारखंडमध्ये विश्वकर्मा पूजेनिमित्त बँका बंद राहतील.
7-8 सप्टेंबर 2022 – ओणमनिमित्त तिरुवनंतपुरम, कोची येथे बँका बंद.
9 सप्टेंबर 2022 – गंगटोकमध्ये इंद्रजातानिमित्त बँका उघडणार नाहीत.
10 सप्टेंबर 2022 – श्री नरवना गुरु जयंतीनिमित्त तिरुअनंतपुरम, कोची येथे बँकांना सुट्टी असेल.
11 सप्टेंबर 2022 – रविवार साप्ताहिक सुट्टी असेल.
18 सप्टेंबर 2022 – रविवारी बँका बंद राहतील.
21 सप्टेंबर 2022 – श्री नारायणा गुरु समाधी दिनानिमित्त तिरुवनंतपुरम, कोची येथे बँका बंद राहतील.
24 सप्टेंबर 2022 – चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असेल.
25 सप्टेंबर 2022 – रविवारी साप्ताहिक सुट्टी.
26 सप्टेंबर 2022 – जयपूर आणि इम्फाळमध्ये नवरात्रीच्या स्थापनेनिमित्त बँकेला सुट्टी असेल.

 

Web Title :- Bank Holidays | bank holidays in september 2022 september 2022 bank holidays news bank holidays list in september

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TET Exam Scam | टीईटी परीक्षा घोटाळ्यात सत्तारांच्या संस्थेतील 10 ते 12 लाभार्थी, अंबादास दानवेंचा खळबळजनक आरोप

 

Pune Crime | पुण्यातील एमजी रोडवर होतेय नामांकित कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

Pradeep Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची प्रकृती बिघडली, ससून रुग्णालयात दाखल