एप्रिलमध्ये १० दिवस बँका बंद , उरकून घ्या महत्त्वाची कामे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खरेतर १ एप्रिल २०१९ पासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. या महिन्यात बँकांना दहा दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही बँकांची कामं करण्यासाठी जाणार असाल तर मात्र ही बातमी नक्की वाचा. या महिन्यात बँकांना १० दिवस सुट्ट्या आहेत मात्र त्या सलग नाहीत. एप्रिलमध्ये नेहमीप्रमाणे बैसाखी, राम नवमी, गुड फ्रायडे आणि महावीर जयंतीची बॅंकाना सुट्टी असणार आहे. तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असतेच.

— या महिन्याच्या पहिल्या शनिवारी म्हणजेच ६ एप्रिल रोजी गुढी पाडवा असल्यामुळे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि गुजरातमध्ये बँका बंद असतील.

— दुसरा शनिवार १३ आणि चौथा शनिवार २७ एप्रिलला येतो या दिवशी बँकांना सुट्टी आहे. पण २० एप्रिलच्या शनिवारी मात्र बँका सुरु राहतील.

— त्यानंतर दुसरा शनिवार १३ तारखेला येतो या दिवशी बँक बंद राहणार आहे.

— १७ एप्रिल (बुधवारी) महावीर जयंती असल्या कारणाने अधिकतर राज्यांमध्ये बॅंकाना सुट्टी राहील. याच्या एक दिवसानंतर १९ एप्रिलला गुड फ्रायडे आहे. यामुळे १९ एप्रिललाही बॅंक बंद राहतील.