आगामी 3 दिवसात उरकून घ्या तुमची बँकेतील सर्व महत्वाची कामे, 31 जानेवारीपासून 3 दिवसांसाठी बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमचे बँकसंबंधित काही काम असेल तर ते 31 जानेवारीपूर्वी उरकून घ्या, कारण दोन दिवस बँका बंद असणार आहेत. शुक्रवार, शनिवार बँक कर्मचारी संपावर जातील, त्यापाठोपाठ रविवार असल्याने बँका सलग 3 दिवस बंद राहतील. SBI कडून या संबंधित माहिती देण्यात आली. 31 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या दोन दिवसीय राष्ट्रव्यापी संपाचे बँकेच्या कामकाजावर परिणाम होईल. बँक कर्मचारी संघटनांना वेतन सुधारणेसंबंधित उपाययोजना न केल्याने 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी संपाची घोषणा केली आहे.

बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संपामुळे बँकेच्या कामकाजावर याचा परिणाम होईल. त्यामुळे ग्राहकांनी बँकसंबंधित कामे उरकून घ्यावीत, ज्याने काही आर्थिक अडचणी येणार नाहीत.

या कारणामुळे उरकून घ्या तुमची बँकसंंबंधित कामे –
31 जानेवारी म्हणजेच शुक्रवारी सर्व बँक कर्मचारी संपावर जातील.
1 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी बँक कर्मचारी संपावर असतील.
2 फेब्रुवारी म्हणजेच रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.

केव्हा असणार बँकांचा संप –
– इंडिया बँक्स असोसिएशनने यूनायडेट फोरम ऑफ बँक यूनियन्स, ज्यात 9 प्रमुख संघटना सहभागी आहेत, त्यांनी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2020 ला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप घोषित केला आहे.
–  UFBU अंतर्गत ऑल इंडिया बँक इम्पॉइज असोसिएश, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन, नॅशनल कन्फेडरेशन ऑफ बँक इम्प्लॉइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक इम्पॉइज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या समावेश होतो.

– यशिवाय इंडियन नॅशनल बँक इम्पॉइज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनाइजेशन ऑफ बँक वर्कर्स आणि नॅशनल ऑर्गनाइजेशन ऑफ बँक ऑफिसर्सच्या संघटना सहभागी आहेत.

– बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संपामुळे बँकेशी संबंधित कामांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी बँकिंगसंबंधित कामे उरकून घ्यावीत, ज्यामुळे कोणत्याही समस्या येणार नाहीत.