Bank Holidays in July 2021 । जुलैमध्ये एकूण 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्टयांची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Holidays in July 2021 | जुलै (2021) महिन्यात बँकेत ग्राहकाचे काही महत्वाचे काम असेल ते जुलै महिण्यापूर्वीच करून घ्या. अथवा जुलै महिन्यातील बँकेची सुट्टी सोडून तुमचं महत्वाचं काम करावं लागणार आहे. सुट्टीमुळे बँकेतील कामे होण्यास अडचण निर्माण होऊ शकते. कारण जुलै महिन्यामध्ये एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र, प्रत्येक राज्यानुसार बँकेच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात. जुलै महिन्याच्या सुट्टीबाबत सविस्तर माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) वेबसाइटवर दिली आहे.(Bank Holidays in July 2021)

तर जुलै महिन्यामध्ये 6 सुट्ट्या या साप्ताहिक आहेत. तर सणसमारंभानिमित्त 9 सुट्ट्या आहेत असे एकूण पंधरा सुट्ट्या जुलै महिन्यात असणार आहेत. मुख्यतः म्हणजे प्रत्येक राज्यानुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. दरम्यान, तुम्ही सर्व सुट्ट्यांची यादी तपासण्यासाठी RBI च्या अधिकृत वेबसाइटला https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx भेट देऊन माहिती घेऊ शकता.

जुलै (2021) महिन्यात ‘या’ दिवशी बँका बंद राहणार –

– 4 जुलै – रविवार

– 10 जुलै – दूसरा शनिवार

– 11 जुलै – रविवार

– 12 जुलै – सोमवार – कांग (राजस्थान), रथ यात्रा (भुवनेश्वर, इम्फाळ,)

– 13 जुलै – मंगळवार – भानू जयंती (शहीद दिवस- जम्मू आणि कश्मीर, भानू जयंती–सिक्किम)

– 14 जुलै – द्रुकपा त्शेची (गंगटोक)

– 16 जुलै – गुरुवार – हरेला पूजा (देहरादून)

– 17 जुलै – खारची पूजा (आगरतळा, शिलाँग)

– 18 जुलै – रविवार

– 19 जुलै – Guru Rimpoche’s Thungkar Tshechu (गंगटोक)

– 20 जुलै – मंगळवार – ईद अल अधा (देशभर सुट्टी)

– 21 जुलै – बुधवार – बकरी ईद (देशभर सुट्टी)

– 24 जुलै – चौथा शनिवार

– 25 जुलै – रविवार

– 31 जुलै – शनिवार – केर पूजा (आगरतळा)

हे देखील वाचा

COVID-19 vaccine tips | सर्दी, खोकला, तापासारख्या कोरोनाच्या लक्षणांनी पीडित लोक लस घेऊ शकतात का?

सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुखांचा थेट संबंध नाही; उच्च न्यायालयात युक्तिवाद

मोठा निर्णय ! 31 जुलैपर्यंत सर्व बोर्डांनी मूल्यांकन धोरणाच्या आधारावर जाहीर करावेत निकाल, सुप्रीम कोर्टाने दिला आदेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : bank holidays in july 2021 15 days banks will remain closed in july

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update