Bank Holidays In Maharashtra | ऑक्टोबरमध्ये 10 दिवस बंद राहणार बँका; खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची लिस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bank Holidays In Maharashtra | बँकेत नागरीकांचे अनेक महत्वाचे काम असते. त्यामुळे नागरीकांनी आता वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे. कारण ऑक्टोबर (October) महिन्यात राज्यात बँकेला 10 दिवस सुट्टी (Bank Holidays In Maharashtra) आहे. त्यामुळे ग्राहकाचे जे महत्वाचे काम आहे ते वेळेनूसार करा. नाहीतर तुमच्या महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. ऑक्टोबर महिन्याच्या सुट्टीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) बँक सुट्ट्यांची लिस्ट जारी केली आहे.

ऑक्टोबर (Bank Holidays In Maharashtra) महिन्यात ज्या ग्राहकाचे बँकेत महत्वाचे काम आहे. त्या ग्राहकांनी सुट्टी आगोदर नियोजन करणे तुम्हाला सोपं जाणार आहे. नाहीतर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. म्हणून सुट्ट्यांबाबत यादी जाहीर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बँकेतील अनेक कामे सध्या ऑनलाईन पद्धतीनेच सुरु आहे. त्यामुळे जरी ग्राहकांना प्रत्यक्ष बँकेत जाऊन महत्वाचं काम असेल तर त्यांनी सुट्ट्यांची लिस्ट (Holiday list) पाहणे आवश्यक आहे.

ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची लिस्ट –

2 ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती

3 ऑक्टोबर – रविवार साप्ताहिक सुट्टी

9 ऑक्टोबर – महिन्याचा दुसरा शनिवार

10 ऑक्टोबर – रविवार साप्ताहिक सुट्टी

15 ऑक्टोबर – दुर्गा पूजा/ दसरा/ विजयादशमी – (इंफाळ आणि शिमला वगळता देशभरातील सर्व ठिकाणच्या बँका बंद)

17 ऑक्टोबर – रविवारी साप्ताहिक सुट्टी

19 ऑक्टोबर – ईद-ए-मिलाद / ईद-ए-मिलादुन्नबी / मिलाद-ए-शरीफ / बारावाफतसाठी – (अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इंफाल, जम्मू, कानपूर, कोची, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथील बँका बंद)

23 ऑक्टोबर – महिन्याचा चौथा शनिवार

24 ऑक्टोबर – रविवारी साप्ताहिक सुट्टी

31 ऑक्टोबर – रविवारी साप्ताहिक सुट्टी

Web Title :- Bank Holidays In Maharashtra | bank holiday in maharashtra october 2021 alert detailed list of how many holidays

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sachin Ahir | महाआघाडी करण्याची इच्छा, मात्र नाही झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी – सचिन अहिर

Pune Court | अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ ! चिंचवडमधील शिक्षकाला तीन वर्षे सक्तमजुरी; 50 हजार रूपये दंडाची शिक्षा

Pune Corporation | लस आहे तर ती द्यायला सिरींजच नाहीत ! पुणे महापालिकेच्या लसीकरणात अडथळ्यांची शर्यत