Bank Holiday : बँकेशी संबंधीत कोणतेही काम असेल तर ते आजच करून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मे महिन्यात जर बँकेशी संबंधीत काहीही काम असेल तर ते आजच करून घ्या. उद्यापासून लागोपाठ 3 दिवस बँका बंद राहतील म्हणजे तुम्ही बँकेच्या ब्रँचशी संबंधीत कोणतेही काम करू शकणार नाही. आरबीआयकडून बँक सुट्ट्यांची लिस्ट जारी केली जाते. यामध्ये राज्यांच्या हिशेबाने सर्व बँकांच्या सुट्ट्या दिल्या जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जारी सुट्ट्यांनुसार साप्ताहिक सुट्ट्या, नॅशनल हॉलिडे मिळून मे महिन्यात 12 दिवस बँका बंद राहणार आहेत.

कोण-कोणत्या दिवशी बँका राहतील बंद
7 मे – शुक्रवार- जमात- उल- विदा ( जम्मू आणि श्रीनगरमध्ये जमात- उल- विदामुळे बँका बंद राहतील)
8 मे – शनिवार- साप्ताहिक सुटी
9 मे – रविवार- साप्ताहिक सुटी
13 मे – गुरूवार- (श्रीनगर, जम्मू, नागपुर आणि कानपुरमध्ये बँक ईदच्या सणानिमित्त बंद राहतील.)
14 मे – शुक्रवार- परशुराम जयंती / ईद/ अक्षय तृतीया (जम्मू, मुंबई, नागपुरमध्ये या दिवशी बँक उघड्या राहतील.)
16 मे – रविवार- साप्ताहिक सुटी
22 मे – शनिवार- साप्ताहिक सुटी
23 मे – रविवार- साप्ताहिक सुटी
26 मे – गुरूवार – बुद्ध पोर्णिमा
30 मे – रविवार- साप्ताहिक सुटी