नोव्हेंबरमध्ये ‘या’ दिवसांत बंद राहतील बँका, पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सणाच्या हंगामामुळे ऑक्टोबर प्रमाणे नोव्हेंबर महिन्यातही अनेक दिवस बँकेला सुट्टी असेल. अशा परिस्थितीत बँक ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे काम वेळेत पूर्ण केले पाहिजे. नोव्हेंबर 2020 मध्ये दीपावलीच्या महत्त्वाचा हिंदू उत्सवाची सुट्टी असण्याबरोबरच साप्ताहिक सुट्ट्याही आहेत, त्यामुळे बँका बंदच राहतील. दीपावलीशिवाय नोव्हेंबरमध्ये गुरु नानक जयंती देखील आहे. या दिवशीही बँकेला सुट्टी असेल.

सर्व बँकांना लागू असतात केंद्र सरकारच्या सुट्ट्या
बँक खातेदारांनी नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की, केंद्र सरकारच्या सर्व सुट्ट्या देशातील सर्व बँक, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांवर लागू होतात. दरम्यान, काही राज्यांमध्ये बँकाच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात. अशा परिस्थितीत बँक ग्राहक सुट्टीनुसार बँकेशी संबंधित कामांची योजना आखतात.

नोव्हेंबरमध्ये बँक सुट्टी

1 नोव्हेंबर – रविवार

8 नोव्हेंबर – रविवार

14 नोव्हेंबर – दुसरा शनिवार / दिपावली उत्सव

15 नोव्हेंबर – रविवार

22 नोव्हेंबर – रविवार

28 नोव्हेंबर – चौथा शनिवार

29 नोव्हेंबर – रविवार

30 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती

You might also like