Bank Holidays In October | ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या कोणत्या राज्यात केव्हा-केव्हा बंद आहेत बँका, येथे पहा पूर्ण List

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Holidays In October | ऑक्टोबर 2021 मध्ये नवरात्र, विजयादशमीसह अनेक सण (Festive season) आहेत. या कारणामुळे या महिन्यात एकुण 21 दिवस बँका बंद (Bank Holidays In October) राहतील. पुढील महिन्यात अनेक दिवस असे सुद्धा येतील ज्यावेळी बँकेला लागोपाठ सुटी (Bank Holidays) असेल. अशावेळी तुमचे बँकसंबंधी काही काम ऑक्टोबरमध्ये असेल तर ते लिस्ट पाहून अगोदरच उरकून घ्या.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ऑक्टोबर महिन्यासाठी अधिकृत बँक सुट्यांच्या यादीनुसार, पुढील महिन्यात 21 दिवस बँकांना (Bank Holidays In October) सुटी आहे. मात्र यामध्ये साप्ताहिक सुट्यांचा सुद्धा समावेश आहे.

पहा सुट्यांची पूर्ण यादी (Bank holidays list)

1 ऑक्टोबर गंगटोकमध्ये अर्ध वार्षिक बँक क्लोजिंग अकाऊंटमुळे काम प्रभावित राहिल.

2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती (सर्व राज्यात बँका बंद)

3 ऑक्टोबर रविवार (साप्ताहिक सुटी)

6 ऑक्टोबर महालया अमावस्या अगरतळा, बेंगळुरु आणि कोलकातामध्ये बँका बंद

7 ऑक्टोबर मीरा चोरेल होऊबा इम्फाळमध्ये बँका बंद

9 ऑक्टोबर शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)

10 ऑक्टोबर रविवार (साप्ताहिक सुटी)

12 ऑक्टोबर दुर्गा पूजा (महासप्तमी) – अगरतळा, कोलकातामध्ये बँका बंद

13 ऑक्टोबर दुर्गापूजा (महाअष्टमी) – अगरतळा, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाल, कोलकाता, पाटणा आणि रांचीमध्ये बँका बंद

14 ऑक्टोबर दुर्गापूजा / दसरा (महानवमी) / आयुधपूजा अगरतळा, बंगळुरु, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपुर, कोच्ची, कोलकाता, लखनऊ, पाटणा, रांची, शिलाँग आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद

15 ऑक्टोबर दुर्गापूजा / दसरा / विजयादशमी इम्फाळ आणि शिमला वगळून इतर ठिकाणी बँका बंद राहतील.

16 ऑक्टोबर दुर्गापूजा (दशैन) गंगटोकमध्ये बँका बंद

17 ऑक्टोबर रविवार (साप्ताहिक सुटी)

18 ऑक्टोबर कटी बिहू गुवाहाटीमध्ये बँका बंद

19 ऑक्टोबर ईद ए मिलाद / ईद ए मिलादुन्नबी / मिलाद ए शरीफ / बारावफात अहमदाबाद, बेलापुर, भोपाळ, चेन्नई, देहरादून, हैद्राबाद, इम्फाळ, जम्मू, कानपुर, कोच्ची, लखनऊ, मुंबई, नागपुर, नवी दिल्ली, रायपुर, रांची, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद

20 ऑक्टोबर महर्षी वाल्मिकी जन्मदिन / लक्ष्मी पूजा / ईद ए मिलाद अगरतळा, बेंगळुरु, चंडीगढ, कोलकाता आणि शिमलामध्ये बँका बंद

22 ऑक्टोबर ईद ए मिलाद उल नबीनंतर शुक्रवार जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद

23 ऑक्टोबर शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

24 ऑक्टोबर रविवार (साप्ताहिक सुटी)

26 ऑक्टोबर विलिनिकरण दिवस जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद

31 ऑक्टोबर रविवार (साप्ताहिक सुटी).

Web Title :- Bank Holidays In October | bank holidays in october 2021 bank will closed 21 days in this month check dates here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | जारी झाले सोने-चांदीचे दर, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Pune Crime | पुण्यात आकडे टाकून वीज चोरीला अटकाव करणार्‍या कर्मचार्‍याला मारहाण

Crime News | पोटात 42 लाखाचे सोने लपवून दिल्लीला निघाला होता ‘तस्कर’, विमानतळावर ‘गोत्यात’