Bank Holidays | 5 दिवस बँका बंद राहणार; पहा सुट्ट्यांची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Holidays | भारतातील सार्वजनिक आणि खासगी बॅंका काही दिवस बंद (Bank Holidays) असणार आहे. या बॅंका साधारण ५ दिवस बंद राहणार आहेत. अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) दिली आहे. या सुट्ट्यांबाबत रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या कॅलेंडरमध्ये नमुद करण्यात आलं आहे. ऑक्टोबर महिन्यात बँकांना एकूण 21 सुट्या आहेत. या आठवड्यात तुम्ही जर बँकेत जाण्याचे नियोजन करत असाल तर, तत्पुर्वी तुम्ही दिवसाचे नियोजन करा. नाहीतर तुमचा गोंधळ होऊ शकतो. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या दिवशी देशातील सार्वजनिक, खासगी, विदेशी, सहकारी आणि प्रादेशिक बँका बंद राहणार आहेत.

जाणून घ्या सुट्ट्यांची यादी…

– 19 ऑक्टोबर (मंगळवार) –

– ईद ई मिलाद/मिलाद ई शेरीफ यामुळे अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू, कानपूर, कोची, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर, तिरुअंनतपूरम येथील बँका बंद असणार आहेत.

– 20 आक्टोबर (बुधवार) –

– महर्षी वाल्मिकी जयंती/लक्ष्मी पूजा/ ईद-ए.मिलाद, अगरतळा, बंगळूरु, चंदीगड, कोलकाता आणि शिमला येथील बँका बंद राहणार आहेत.

– 22 ऑक्टोबर (शुक्रवार) –

– ईद ए मिलाद उल नाबीमुळे शुक्रवारी जम्मू, श्रीनगरमधील बँका बंद राहतील.

– 23 ऑक्टोबर (शनिवार) – महिन्यातील चौथा शनिवार

– 24 ऑक्टोबर – रविवार सुट्टी

– 26 ऑक्टोबर – प्रवेश दिन, जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद राहतील.

हे देखील वाचा

Rakesh Jhunjhunwala | कमाईची सुर्वणसंधी ! SEBI ने 6 कंपन्यांच्या IPO ला दिली मंजूरी, जमवणार 12 हजार कोटी रुपये

Pune News | भाजपने राज ठाकरेंच्या नादाला लागू नये, फटका बसेल – रामदास आठवले (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Bank Holidays | in this week banks to remain closed for five days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update