Bank Holidays June-2022 | जून महिन्यामध्ये 12 दिवस बँका बंद राहणार; सुट्ट्यांची संपूर्ण यादी पहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Holidays June-2022 | जून (2022) महिन्यामध्ये बँकेत कोणतेही कामाचे प्लॅन तयार करत असाल तर आताची एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जून महिन्यामध्ये जवळपास 12 दिवस बँका बंद (Bank Holidays June-2022) राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही पुढील महिन्यातील कामांसाठी बँकेच्या शाखेत जाण्याआधी बँक सुट्ट्यांची यादी (List Of Bank Holidays) चेक करणे आवश्यक आहे. नाहीतर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकेच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे.

 

जून महिन्यामध्ये (Bank Holidays June-2022) येणार्‍या काही सुट्ट्या/सण हे विशिष्ट राज्य अथवा प्रदेशाशी संबंधित असतात. म्हणून, बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात. त्याचबरोबर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार शिवाय महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. त्यामुळे बँक सुट्ट्यांची यादी पाहून तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामाचे नियोजन करु शकता. कारण पुढे तुम्हाला कोणतेही अडचण होणार नाही.

 

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक सुट्ट्यांची यादी तीन श्रेणीत विभागली आहे. यात पहिली- हॉलिडेज अंडर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट (Holiday under Negotiable Instruments Act), दुसरी- हॉलिडेज अंडर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे (Holiday under Negotiable Instruments Act and Real Time Gross Settlement Holiday) आणि तिसरी- बँक के अकाउंट क्लोजिंग (Banks’ Closing of Accounts) श्रेणी आहे.

जून 2022 मधील बँक सुट्ट्यांची यादी –

2 जून (गुरुवार) – महाराणा प्रताप जयंती/तेलंगणा स्थापना दिवस – हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा

3 जून (शुक्रवार) – श्री गुरु अर्जुन देव जी यांचा हुतात्मा दिवस – पंजाब

5 जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

11 जून (शनिवार) – दुसरा शनिवार बँक सुट्टी

12 जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

14 जून (मंगळवार) – पहिला राजा/संत गुरू कबीर जयंती – ओरिसा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, हरयाणा, पंजाब

15 जून (बुधवार) – राजा संक्रांती/वायएमए दिवस/गुरु हरगोविंद यांचा जन्मदिवस – ओरिसा, मिझोराम, जम्मू आणि काश्मीर

19 जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

22 जून (बुधवार) – खारची पूजा – त्रिपुरा

25 जून (शनिवार) – चौथा शनिवार बँक सुट्टी

26 जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

30 जून (बुधवार) – रामना नी – मिझोरम

Web Title :- Bank Holidays June-2022 | bank holidays in june 2022 rbi issues bank holidays calender of may see here full list marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात जीएसटी विभागाची मोठी कारवाई ! 41 कोटींचे टॅक्स क्रेडिट घेणाऱ्या व्यापाऱ्याला अटक

 

Paytm चा शेयर 450 रुपयांपर्यंत घसरणार की 1300 रुपयांपर्यंत वाढणार? जाणून घ्या ब्रोकरेज हाऊसेसचे मत

 

Pune Pimpri Crime | दारु धंद्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या रागातून जीवे मारण्याचा प्रयत्न