Bank Holidays November 2021 | नोव्हेंबरमध्ये पूर्ण 17 दिवस बंद राहणार बँका! कामासाठी जाण्यापूर्वी पहा सुट्ट्यांची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Holidays November 2021 | तुम्ही नोव्हेंबरमध्ये बँकेसंबंधी एखादे काम करण्याचे ठरवले असेल तर अगोदर ही बातमी वाचून घ्या. नोव्हेंबर 2021 मध्ये धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छठपूजा, गुरुनानक जयंतीसारख्या अनेक सुट्ट्या आहेत. यामुळे एकुण 17 दिवस बँका बंद (Bank Holidays November 2021) राहतील.

 

काही दिवस लागोपाठ सुद्धा बँका बंद राहणार आहेत. शिवाय रविवारसह दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी सुद्धा बँका बंद असतात. निगोशिएबल इंस्ट्रुमेंट अंतर्गत आरबीआयने 1, 3, 4, 5, 6, 10, 11, 12, 19, 22 आणि 23 नोव्हेंबरला सुट्टीची घोषणा केली आहे. (Bank Holidays November 2021)

 

नोव्हेंबर 2021 मधील बँकेच्या सुट्ट्या

1 नोव्हेंबर – कन्नड राज्योत्सव / Kut – बेंगळुरु आणि इम्फाळमध्ये बँका बंद

3 नोव्हेंबर – नरक चतुर्दशी – बेंगळुरुमध्ये बँका बंद

4 नोव्हेंबर – दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन) / दीपावली / कालिका पूजा – बेंगळुरु सोडून सर्व राज्यात बँका बंद

5 नोव्हेंबर – दिवाळी (बलि प्रतिपदा) / विक्रम संवत नववर्ष / गोवर्धन पूजा – अहमदाबाद, बेलापुर, बेंगळुरु, देहरादून, गंगटोक, जयपुर, कानपुर, लखनऊ, मुंबई आणि नागपुरमध्ये बँक बंद

6 नोव्हेंबर – भाऊबीज / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजन / दीपावली / निंगोल चाकोबा – गंगटोक, इम्फाल, कानपुर, लखनऊ आणि शिमलामध्ये बँका बंद

7 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुटी)

10 नोव्हेंबर – छठ पूजा / सूर्यषष्ठी डाला छठ – पाटणा आणि रांचीमध्ये बँका बंद

11 नोव्हेंबर – छठ पूजा – पाटणामध्ये बँका बंद

12 नोव्हेंबर – वांगला उत्सव – शिलाँगमध्ये बँका बंद

13 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)

14 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुटी)

19 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती / कार्तिक पोर्णिमा – आयजोल, बेलापुर, भोपाळ, चंदीगढ, डेहरादून, हैद्राबाद, जयपुर, जम्मू, कानपुर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपुर, नवी दिल्ली, रायपुर, रांची, शिमला, श्रीनगरमध्ये बँका बंद

21 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुटी)

22 नोव्हेंबर – कनकदास जयंती – बेंगळुरुमध्ये बँका बंद

23 नोव्हेंबर – सेंग कुट्सनेम – शिलाँगमध्ये बँका बंद

27 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

28 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुटी)

 

Web Title :- Bank Holidays November 2021 | bank holidays 2021 banks will remain closed for 17 days in november check here full list of holidays

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Cruise Drug Case | नवाब मलिक यांच्या आरोपानंतर आणखी एका मंत्र्याचा पाठिंबा, फोटो ट्विट करत विचारला ‘हा’ सवाल

PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या 10 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसविना? प्रशासन, स्थायी समितीमध्ये अद्याप बोनसचा ‘प्रस्ताव’ नाही

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये डाळींब पॅकिंगवरुन तरुणावर तलवारीने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या 5 जणांना अटक

Aryan Khan Drug Case | भाजपा नेत्याचा मोठा दावा ! प्रभाकर साईलनं समीर वानखेडेंवर पैसे घेतल्याचा खोटा आरोप केला? पहा ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडीओ