Bank Interest Rate Hike | HDFC पाठोपाठ ‘या’ बँकेनेही वाढवले व्याजदर, नवे व्याजदर लागू: EMI ही वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – HDFC बँकेने व्याजदर वाढवल्यानंतर आणखी एका बँकेने व्याजदर (Bank Intrest Rate Hike) वाढवले आहे. यामुळे EMI आणि व्याजदर वाढल्याने ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढणार आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या कॅनरा बँकेने (Canara Bank) कर्जाच्या व्याजदरात वाढ (Bank Interest Rate Hike) केली आहे. बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये (Marginal Cost of Lending Rate) 15-20 बेसिस पॉइंटने वाढ केली. तसेच रेपो रेट लिंक्ड लेंडिंग रेटमध्येही (Repo Rate Linked Lending Rate) वाढ करण्यात आली आहे. हे नवे व्याजदर 7 नोव्हेंबर 2022 पासून लागू झाले आहेत.

ग्राहकांना कार लोन (Car Loan), होम लोन (Home Loan), एज्युकेशन लोनचा (Education Loan) अधिक व्याजदर (Bank Interest Rate Hike) द्यावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांवर अधिकचा खर्चाचा बोजा पडणार आहे. देशातील महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक (RBI) सातत्याने आपल्या रेपो रेटमध्ये वाढ करत असते.

कॅनरा बँकेचा MCLR वाढून एका वर्षाच्या लोनसाठी तो 7.90 वरुन 8.10 पर्यंत केला आहे. तर 6 महिन्याच्या लोनचा MCLR 7.80 वरुन 8 वर पोहोचला आहे. एका वर्षाच्या रेपो रेट लिंक्ड रेट आता 8.80 वर पोहचला आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना EMI आणि व्याज जास्तीचे भरावे लागणार आहे.
HDFC बँकेने व्याजदर वाढवल्यानंतर कॅनरा बँकेनेही व्याजदर वाढवले आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात इतर बँका देखील व्याजदर वाढवणार का याची धाकधूक लागली आहे.

FD चे व्याजदर वाढवले

दोन कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर व्याजदर वाढवण्यात आले आहेत.
31 ऑक्टोबर रोजी हा निर्णय घेतला आहे. 7 दिवसांपासून 10 वर्षापर्यंतच्या एफडीवर व्याजदर वाढवण्यात
आलं आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी 3.25 ते 6.50 आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.25 ते 7.50 टक्क्यांपर्यंत
व्याजदर मिळत आहे.

Web Title :-  Bank Interest Rate Hike | canara bank hike intrest rate after hdfc now emi price high

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त विधानावरुन राजकीय वातावरण तापलं, राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट; केली ‘ही’ मागणी

Devendra Fadnavis | ‘अब्दुल सत्तार जे बोलले त्याचं मी समर्थन करणार नाही, ते चुकच आहे, पण…’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका (व्हिडिओ)