
Bank Interest Rate | ‘या’ 4 सरकारी बँकेत Saving Account वर मिळतंय सर्वाधिक व्याज; जाणून घ्या कसा होतोय फायदा
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bank Interest Rate | भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) काल (बुधवारी) रेपो दरात (Repo Rate) 50 आधार अंकांनी वाढ करण्यात आली. यानंतर सध्या रेपो रेट 4.90 टक्के वर पोहचला आहे. रेपो दरात मागील 36 दिवसामध्ये 90 बेसिस पॉइंटची वाढ झालीय. याचा फटका कर्जावर बसला आहे. तसेच, फिक्स्ड डिपॉझिटच्या (FD) दरातही वाढ झाल्याने काही बँकांनी FD आणि बचत खात्यांवरील व्याजदर (Bank Interest Rate) वाढवण्यास सुरुवात केली आहे. तर व्याजदर पुन्हा वाढेपर्यंत गुंतवणूकदारांना (investors) थोडी वाट पाहावी लागेल.
जवळपास चार सार्वजनिक क्षेत्रातील बँकां आहेत. याबाबत जाणून घेणे आवश्यक आहे. या बँका ग्राहकांना सर्वाधिक व्याजदर देते. विशेष म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) बचत खात्यावर सर्वात कमी म्हणजेच 2.70 टक्के व्याज देत आहे. पण जर तुम्ही बचत खाते उघडण्याचा विचार करत असाल तर याबाबत जाणून घ्या. (Bank Interest Rate)
1. युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) –
या बँकांमध्ये बचत खात्यांवर सर्वाधिक व्याजदर देते. यूबीआयच्या वेबसाइटनुसार हा व्याजदर 3.55 टक्के आहे. 1 जून 2022 पासून बँका 50 लाख रुपयांपर्यंतच्या बचत खात्यातील शिलकींवर 2.75 टक्के, 50 लाख ते 100 कोटी रुपयांपर्यंतच्या बचत खात्यावरील शिलकीवर 2.90 टक्के आणि 100 कोटी ते 500 कोटी रुपयांपर्यंत 3.40 टक्के व्याज दर देत आहे. तसेच शिल्लक रकमेवर 3.10 टक्के, 500 ते 1000 कोटी रुपयांच्या वरच्या बचत खात्यातील शिल्लक रकमेवर 3.40 टक्के आणि 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेवर 3.55 टक्के व्याज दिले जातेय.
2. कॅनरा बँक (Canara Bank) –
बचत खात्यावर सर्वाधिक व्याज देणारी कॅनरा ही दुसरी सरकारी बँक (Government Bank) आहे.
बँक 50 लाखांपेक्षा अधिक आणि 100 कोटी रुपयांपेक्षा कमी बचत खात्यावरील शिल्लक 2.90 टक्के व्याज दर देत आहे.
तसेच बँक 100 कोटी आणि 500 कोटींहून अधिक बचत खात्यावरील शिल्लक रकमेवर 3.05 टक्के, 500 कोटी ते 1000 कोटींच्या बचत खात्यावर 3.35 टक्के आणि 1000 कोटींहून जादा बचत खात्यावर 3.50 टक्के व्याज देत आहे.
3. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) –
यामध्ये 1 लाख ते 100 कोटी रुपयांपर्यंतच्या खात्यांवर 2.75 टक्के व्याज देत आहे.
बँकेचे नवीन दर 25 फेब्रुवारी 2022 पासून लागू झाले आहेत. बँक 1 लाख ते 100 कोटी रुपयांच्या बचत खात्यावर 2.75 टक्के व्याजदर देत आहे.
100 कोटी ते 200 कोटी रुपयांच्या बचत खात्यावर 2.85 टक्के व्याज दिले जात आहे.
200-500 कोटी रुपयांच्या बचत खात्यावर 3.05 टक्के व्याजदर दिला जात आहे.
500 ते 1000 कोटी रुपयांपर्यंतच्या बचत खात्यावर 3.25 टक्के व्याजदर दिला जात आहे.
तसेच, 1 हजार कोटींहून अधिक खात्याच्या शिल्लक स्लॅबवर 3.30 टक्के व्याजदर उपलब्ध आहे.
4. पंजाब आणि सिंध बँक (Punjab And Sindh Bank) –
10 कोटी रुपयांपेक्षा कमी खात्यातील शिल्लकीवर 3.00 टक्के व्याज आणि 10 कोटी किंवा त्याहून अधिक खात्यातील शिल्लक रकमेवर 3.20 टक्के व्याज उपलब्ध आहे.
बँक 10 कोटी रुपयांपेक्षा कमी बचत खात्यावर 3 टक्के परतावा देत आहे.
तर बँक ग्राहकांना 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक बचत खात्यावर 3.20 टक्के परतावा मिळत आहे.
हे दर 1 फेब्रुवारी 2022 पासून लागू आहेत.
Web Title :- Bank Interest Rate | in these four government banks offering highest interest on savings account see how much is earned
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update