नवी दिल्ली : Bank Job Alert | ग्रॅज्युएशननंतर बँकेत नोकरीचे स्वप्न पाहत असलेल्या तरुणांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने State Bank of India (SBI) मोठी संधी आणली आहे. एसबीआयमध्ये अॅप्रेंटीस पदाच्या भरतीसाठी (SBI Apprentice Recruitment) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, देशभरातील स्टेट बँकेच्या शाखांमध्ये भरती होणार आहे. (Bank Job Alert)
या व्हॅकन्सीच्या माध्यमातून एकुण ६१६० पदांवर भरती होईल. या पदासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता.
एसबीआयकडून जारी नोटिफिकेशननुसार, अॅप्रेंटीस पदासाठी अर्ज प्रक्रिया आज म्हणजे १ सप्टेंबर २०२३ पासून सुरू झाली आहे. यात अप्लाय करण्यासाठी उमेदवाराला २१ सप्टेंबर २०२३ पर्यंत वेळ आहे. अर्जासाठी केवळ २१ दिवस मिळालेले आहेत अशावेळी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. अर्ज करण्याची पद्धत खाली पाहू शकता.
SBI Apprentice साठी करा अप्लाय
- ऑफिशियल वेबसाईट sbi.co.in वर जा.
- वेबसाईटच्या होम पेजवर Careers च्या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर Engagement of Apprentices Under The Apprentices च्या लिंकवर जा.
- पुढील पेजवर रजिस्ट्रेशन फॉर्म भरा.
- रजिस्ट्रेशननंतर अॅप्लीकेशन फी जमा करा.
- अखेरीस अर्ज भरून प्रक्रिया पूर्ण करा.
- नंतर प्रिंट घ्यायला विसरू नका.
SBI Apprentice Recruitment 2023 Application येथे डायरेक्ट फॉर्म भरा.
अर्ज शुल्क
जनरल, ओबीसी आणि EWS कॅटेगरीच्या उमेदवारांना ३०० रुपये फी जमा करावी लागेल. यांच्याशिवाय इतर सर्व वर्ग विना शुल्क अर्ज करू शकतात. शुल्क ऑनलाईन भरायचे आहे.
SBI Apprentice पात्रता आणि वय
अॅप्रेंटीस पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. कोणत्याही शाखेतून पदवी घेणारे उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय २० वर्षापेक्षा जास्त आणि २८ वर्षापेक्षा कमी वय असणारे सहभागी होऊ शकतात. आरक्षणाच्या कक्षेतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जारी या व्हॅकन्सीच्या माध्यमातून एकुण ६१६० पदांवर भरती होईल. यामध्ये सर्व राज्यांसाठी जागा ठरलेल्या आहेत. सर्वात जास्त जागा राजस्थानमध्ये आहेत. येथे ९२५ पदांवर भरती होईल. यानंतर तामिळनाडुमध्ये ६४८ पदांवर भरती होईल. तर, महाराष्ट्रात एकुण ४६६ पदे भरली जातील. राज्य आणि जिल्ह्यांनुसार जागा ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update