Bank Loan Interest Rates Hike | बॅंकेचे कर्ज आणखी महागले; आता भरावा लागणारा जास्तीचा EMI

पोलीसनामा ऑनलाइन – Bank Loan Interest Rates Hike | अनेक लोक त्यांची वित्तीय गरज भागवण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेत या कर्जांचे हफ्ते भरत आहेत. मात्र दिवसेंदिवस बॅंकेचे हे कर्ज (Bank Loan) महाग होत चालले आहे. याचा बोजा सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे. आता भारतातील आणखी एका खासगी कंपनीने मार्जिनल कॉस्ट फंड बेस्ड लेंडिंग रेट्समध्ये (Marginal Cost Fund Based Lending Rates) वाढ केली आहे. याचा अर्थ असा की आता या बॅंकेच्या कर्जदारांना जास्तीचे व्याजदर (Bank Loan Interest Rates Hike) भरावे लागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नसला तरी देखील या बॅंकेने कर्जाच्या व्याजदरामध्ये वाढ केली आहे.

आपल्या देशामध्ये अनेक राष्ट्रीयीकृत बँकसह खाजगी बॅंकेचे (Private Bank) देखील लोकांना तेवढेच आकर्षण आहे. ठेवींवर मिळणाऱ्या अधिक व्याजदरामुळे देखील लोक खासगी बॅंकेंना पसंती दर्शवतात. अशी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची खाजगी बॅंक असणारी ॲक्सिस बॅंकने (Axis Bank) त्यांच्या मार्जिनल कॉस्ट फंड बेस्ड लेंडिंग रेट्समध्ये वाढ केली आहे. यापुढे MCLR आधारित दराची श्रेणी 8.95 टक्के ते 9.30 टक्के दरम्यान असेल. एका रात्रीमध्ये हा बदल करण्यात आला असून MCLR दर थेट 5% हून 8.95 % झाला (Axis Bank Interest Rates Hike) आहे. तीन वर्षे आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR दर 9.05 टक्के आणि 9.10 टक्के असणार आहे. कर्जाचा कालावधी एका वर्षासाठी असल्यास MCLR 9.15 टक्के, दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी 9.25 टक्के आणि 9.30 टक्के आहे. पुढील रिव्ह्युपर्यंत हे दर वैध राहतील, असे बँकेतर्फे सांगण्यात आले आहे.

मागील अनेक महिन्यांपासून बॅंक कर्जावरील व्याजदरामध्ये झपाट्याने वाढ (Bank Loan Interest Rates Hike) होत आहे.
सामान्याच्या गरजा पुरवणारे कर्ज हे महत्त्वाचे स्त्रोत असल्याने याचा फटका सामान्य लोकांच्या खिशाला बसत आहे.
या ऑगस्ट महिन्यामध्ये Axis बँकेसोबत HDFC बँक, ICICI बँक, कॅनरा बँक (Canara Bank), 
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) आणि आणखी काही बँकांनी ऑगस्ट महिन्यात MCLR वाढवला आहे.
रेपो दराबाबत आरबीआयच्या (RBI) निर्णयापूर्वीच काही बँकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
बँकेकडून करण्यात येत असलेल्या या MCLR मधील वाढीमुळे कर्जदारांच्या कर्जाचा व्याजदर वाढेल आणि त्यांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhaar Card Update | सावधान!  आधार कार्ड अपडेटसाठी मोबाईलवर डॉक्युमेंट पाठवणे धोक्याचे: होऊ शकतो स्कॅम