Bank मध्ये लॉकर असेल तर व्हा सावध, असे गायब झाले करोडो रूपयांचे Gold

नवी दिल्ली : जर तुमचे बँकेत लॉकर आहे किंवा घेण्याचा विचार करत आहात, तर तिथे ठेवलेल्या वस्तूंच्या सुरक्षेबाबत जरूर माहिती घ्या. लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या सुरक्षेची जबाबदारी बँकेची नाही. असे समजले जाते की, बँकेच्या लॉकरमध्ये जे काही ठेवले आहे त्याची माहिती तुम्हालाच असते. अशावेळी बँक लॉकरमध्ये होणार्‍या नुकसानीची भरपाई करत नाही. नुकतीच अशी एक केस आली आहे. येथे लॉकरमधून करोडो रूपयांचे सोने गायब झाले आहे, परंतु बँकवाले जबाबदारी घेण्यास नकार देत आहेत. लॉकरच्या मालकाने आता अखेर त्रस्त होऊन पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. लॉकर मालकानुसार बँकेच्या बेजबाबदारपणामुळे नुकसान झाले आहे, परंतु अजून या प्रकरणातून मार्ग निघालेला नाही.

अशी झाली लॉकरमधून चोरी
लखनऊमध्ये चौक येथील खुन खुन जी रोडवरीलन बँक ऑफ बडोदाच्या शाखेत हा प्रकार घडला. या शाखेतून लॉकरमधून कोरोडो रूपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. लोकांचा आरोप आहे की, यामध्ये बँकेच्या कर्मचार्‍यांचा हात आहे. या घटनेने पीडित व्यक्ती सॉफ्टवेयर इंजीनियर असून त्याने चौक पोलीस ठाण्यात बँकेच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. अमित प्रकाश बहादुर सॉफ्टवेयर इंजीनियरचे नाव आहे. सध्या ते बेंगळुरूमध्ये राहतात. या शाखेत त्यांचे वडील डॉ. रविंद्र बहादुर आणि आई पुष्पा बहादुर यांच्या नावाने संयुक्त खाते आहे. 30 ऑक्टोबरला डॉ. रविंद्र पत्नी पुष्पासोबत बँकेत लॉकरमध्ये काही ठेवण्यासाठी गेले असता लॉकरमधील सोने गायब होते. एकुण दागिन्यांचे वजन सुमारे दोन किलोग्रॅम होते, जे गायब झाले.

बँक आणि पोलिसांची टाळाटाळ
या प्रकरणात बँकेने त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. 23 ऑक्टोबरच्या या घटनेनंतर त्यांना 26 ऑक्टोबरला बँकेत येण्यास सांगितले. नंतर पुन्हा काही दिवस टाळाटाळा आणि दुर्लक्ष केले. त्रासलेले हे दांपत्य पोलीसात गेले. परंतु, तेथेही तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळा करण्यात आली. तब्बल 8 नोव्हेंबरला एफआयआर दाखल झाला. अमित यांनी बँक व्यवस्थापक, त्यांचे कर्मचारी तसेच लॉकर इंन्चार्ज स्वातीवर चोरीचा आरोप केला आहे. दरम्यान, आरबीआयच्या नियमानुसार ग्राहकाच्या किमती वस्तू लॉकरमधून गायब झाल्यास बँकेची अजिबात जबाबदारी असणार नाही

बँकेत ठेवलेल्या सोन्याचा विमा उतरवा
बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या सामानाचा विमा देत नाही. मात्र काही कंपन्या भारतात गोल्ड इंश्युरन्स पॉलिसी विकत आहेत. यामध्ये टाटा एआयजी, इफ्को टोकियो जनरल इंश्युरन्स, आयसीआयसीआय लोंबार्ड आणि फ्यूचर जनराली सारख्या कंपन्या आहेत. यापैकी काही इंश्युरन्स कंपन्यांनी अलिकडे बँक लॉकर प्रोटेक्शन पॉलिसी सुद्धा सुरू केली आहे.