Bank Locker Rules Changed | जर वर्षातून एकवेळा बँक लॉकर उघडला नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता, बँक उचलू शकते ‘हे’ पाऊल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Bank Locker Rules Changed | बहुतांश लोक आपले दागिने आणि इतर किमती वस्तू सुरक्षेच्या दृष्टीने बँक लॉकर (Bank Locker Rules Changed) मध्ये ठेवतात. परंतु एका ठराविक मोठ्या काळापर्यंत लॉकर उघडला गेला नाही तर बँक तुमचा लॉकर तोडू शकते. तुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सेफ डिपॉजिट लॉकरबाबत सुधारित मार्गदर्शक तत्त्वे (revised guidelines on safe deposit lockers) जारी केली आहेत. यामध्ये बँकांना अशी लॉकर उघडण्याची परवानगी दिली आहे.

बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विविध विकास, ग्राहक तक्रारींची पद्धत आणि बँका आणि भारतीय बँक संघाकडून प्राप्त प्रतिक्रिया लक्षात घेऊन, आरबीआय (RBI) ने अलिकडेच सुरक्षित जमा लॉकर्ससंबंधीच्या आपल्या मार्गदर्शक तत्त्वां (new guidelines) मध्ये सुधारणा केली आहे आणि निष्क्रिय बँक लॉकर्सबाबत नवीन निर्देश सुद्धा दिले.

भाडे वेळेवर देत असूनही बँक तोडू शकते लॉकर

आरबीआयच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकेला लॉकर तोडणे आणि लॉकरचे साहित्य आपल्या नॉमिनी/कायदेशीर वारसदाराकडे हस्तांतरीत करणे किंवा पारदर्शक पद्धतीने वस्तूंची विल्हेवाट लावण्याचे स्वातंत्र्य असेल.
जर लॉकर 7 वर्षाच्या कालावधीत निष्क्रिय राहिले आणि नियमित प्रकारे भाडे जरी भरले जात असेल.
लॉकर भाडेकरूचा शोध लावला जाऊ शकत नसेल तर लॉकर तोडला जाऊ शकतो.

लॉकर तोडण्याच्या सर्व नियमांचे पालन करा

परंतु सोबतच जनहिताचे रक्षण करत आरबीआयने विस्तृत निर्देश सुद्धा जारी आहेत की,
कोणतेही लॉकर तोडण्यापूर्वी सर्व नियमांचे पालन केले जावे.

लॉकर घेणार्‍यास अलर्ट करेल बँक

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, बँकेकडून लॉकर भाड्याने घेणार्‍यांना पत्र,
ईमेल आणि मोबाइल, फोन नंबरवर एसएमएस अलर्ट पाठवला जाईल.

 

2 वर्तमानपत्रात नोटीस जारी करावी

जर पत्र डिलिव्हरीशिवाय परत आले किंवा लॉकर घेणार्‍याचा शोध लागला नाही तर त्यास योग्य वेळ देत एक इंग्रजी आणि एक स्थानिक वर्तमानपत्रात नोटीस जारी केली जाईल.

लॉकर उघडण्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पुढे म्हटले आहे की, बँकेचा एक अधिकारी आणि दोन स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत लॉकर उघडला पाहिजे आणि संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले गेले पाहिजे.

फायरप्रूफ तिजोरीत ठेवावे साहित्य

आरबीआयने पुढे म्हटले आहे की, लॉकर उघडल्यानंतर, साहित्य एक सीलबंद लिफाफामध्ये ठेवावे,
ज्यामध्ये सविस्तर इन्व्हेंट्रीसह एका फायरप्रूफ तिजोरीच्या आत एका टॅम्पर प्रूफ पद्धतीने ग्राहकाद्वारे दावा करे पर्यंत ठेवले जाईल.

 

Web Title : Bank Locker Rules Changed | bank locker rules changed what if your bank locker remains inoperative for a long period of times

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Update | सोन्याच्या किंमतीमधील चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये गडबड, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन भाव

Modi Government | ज्येष्ठांवर मोदी सरकार मेहरबान, खर्चासाठी दर महिना मिळतील इतके हजार रुपये; जाणून घ्या

Pune Crime | पुण्याच्या पारगाव मेमाणे गावात पूर्ववैमनस्यातून गोळीबार, टोळक्यांचा गावात धुडगुस; माजवली दहशत