Bank Locker Rules | बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल, जर तुम्ही सुद्धा घेतला असेल ‘लॉकर’ तर जाणून घ्या नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Locker Rules | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक लॉकर नियमांमध्ये बदल (Bank Locker Rules) केला आहे. यासाठी केंद्रीय बँकेने लॉकरमध्ये सेफ डिपॉझिट (Safe Deposit Locker) आणि बँकांकडून देण्यात येणार्‍या सिक्युअर कस्टडी फॅसिलिटी (Secure Custody Facility) साठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

रिझर्व्ह बँकेने बँकांसोबतच भारतीय बँक संघासोबत (IBA) चर्चा केल्यानंतर आणि ग्राहकांकडून तकारी मिळाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. अशावेळी जर तुम्ही सुद्धा बँक लॉकर सुविधा घेतली असेल तर तुमच्यासाठी आरबीआयकडून जारी नवीन नियमांची (RBI New Rules) माहिती असणे आवश्यक आहे.

बँकांकडून लॉकर अलॉटमेंटच्या वेळी फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) घेण्याचा अधिकार आहे. यामुळे हे निश्चित होईल की लॉकरची सुविधा देणारा व्यक्ती वेळेवर भाडे भरत (Locker Rent Payment) राहील.

तर, बँकेकडून वाटपाच्यावेळी घेतल्या जाणार्‍या रक्कमेत तीन वर्षाचे भाडे आणि लॉकर (Bank Locker Rules) तोडण्याच्या शुल्काचा समावेश असेल. बँकांना सध्याच्या लॉकरहोल्डर्स किवा अशा ग्राहकांकडून मुदत ठेव (FD) मागणी नाही, ज्यांच्याकडे अगोदरपासून चालू लॉकर आहेत.

 

दुर्घटनेची लवकरात लवकर ग्राहकांना द्यावी लागेल माहिती

– बँकेने अगोदरच लॉकरचे भाडे घेतले असेल तर ग्राहकांना आगाऊ रक्कमेतून विशेष रक्कम परत केली जाईल.

– नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत ग्राहकांना लवकरात लवकर माहिती देण्यासाठी बँक जबाबदार असेल.

– लॉकरमध्ये ठेवलेल्या सामानाचे नुकसान झाले तर बँकेने बोर्ड मान्य धोरणानुसार तयार राहावे, ज्यामध्ये त्यांच्या उत्तरदायित्वाची माहिती असेल.

– बँकांना लॉकर केयरच्या अंतर्गत लॉकर सिस्टमचे योग्य संचालन आणि त्यामध्ये आमन्य गोष्टी पोहचणार नाहीत हे पहावे लागेल.

– भूकंप, पूर सारख्या नैसर्गिक आपत्तीसाठी लॉकरच्या नुकसानीला बँक जबाबदार नसेल.

बँकेला करावा लागेल एका अतिरिक्त क्लॉजचा समावेश
केंद्रीय बँकेच्या नवीन नियमानुसार, सर्व बँक लॉकर अ‍ॅग्रीमेंटमध्ये एका अतिरिक्त क्लॉजचा सुद्धा समावेश असेल.
बँक लॉकर अ‍ॅग्रीमेंटमध्ये एका अतिरिक्त क्लॉजचा सुद्धा समावेश करेल.

 

यातून हे निश्चित केले जाईल की, लॉकर भाड्याने घेणारा ग्राहक त्यामध्ये काहीही धोकादायक ठेवणार नाही.
सोबत बँकांनी बँक व्यावसायिकाकडून फसवणूक,
आग किंवा इमारत कोसळण्याच्या स्थितीत वार्षिक भाडे रक्कमेच्या 100 पट पेमेंट ग्राहकाला करावे लागेल.

 

Web Title :- Bank Locker Rules | rbi changed bank locker rules know new rules and impact on bank customers locker chrages

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation GB | तुकाई दर्शन येथील पाण्याच्या टाकीचे पाणी ‘महंमद वाडी’ला वळविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी – माजी महापौर वैशाली बनकर (व्हिडीओ)

Pune News | कुत्र्यांच्या नसबंदीच्या ‘ऑपरेशन’ थिएटरमध्ये उंदरांचा सुळसुळाट; बंदोबस्तासाठी ‘मांजरी’ पाळायच्या? (व्हिडीओ)

7th Pay Commission | 7 दिवसानंतर 31% DA सह वेतन देणार मोदी सरकार; वाढतील 20484 रुपये, जाणून घ्या गणित