बँक मॅनेजरचं नशीबचं फळफळलं, काचेचा तुकडा म्हणून ज्याला उचललं तो निघाला 9 कॅरेटचा हिरा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   आपण बर्‍याचदा असे ऐकले असेल की, कोणाचे नशीब कधी चमकेल, याची कल्पना केली जाऊ शकत नाही. असेच घडले एका बँकेच्या व्यवस्थापकाशी. पार्कमध्ये मित्रांसह फिरताना त्याचे नशीब चमकले , त्याने तेथे एक मौल्यवान 9.07 कॅरेटचा हिरा सापडला. दरम्यान सुरुवातीला त्या व्यक्तीला वाटले कि, काचेचा तुकडा आहे आणि उचलून आपल्या बॅगेत टाकले. परंतु जेव्हा त्याला वास्तविकता कळली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावला नाही. हे प्रकरण अमेरिकेतील दक्षिण – पश्चिम अर्कांससचे आहे.

पार्कमध्ये चालताना सापडली स्फटिकासारखी वस्तू

दरम्यान, अर्कान्सासमध्ये राहणारा 33 वर्षीय केविन किन्नार्ड हा एक बँक मॅनेजर आहे. केविन आपल्या काही मित्रांसह स्टेट पार्कमध्ये फिरायला आला होता. यावेळी, त्याने एक चमकणारा क्रिस्टल पाहिला. केव्हिनला वाटले की तो एका काचेचा तुकडा आहे, परंतु त्याची चमक पाहून त्याने ते आपल्या बॅगेत ठेवले. यानंतर, जेव्हा त्याने पार्कमध्ये कर्मचार्‍यांकडे तपासणी केली तेव्हा आढळले की, मागील 48 वर्षांच्या इतिहासात त्या उद्यानात सापडलेला हा दुसरा सर्वात मोठा हिरा आहे.

48 वर्षांच्या इतिहासात मिळाला दुसरा सर्वात मोठा हिरा

यानंतर, जेव्हा त्याने पार्कमध्ये कर्मचार्‍यांकडे चौकशी केली, तेव्हा आढळले की, मागील 48 वर्षांच्या इतिहासात त्या उद्यानात हा दुसरा सर्वात मोठा हिरा आहे. या संदर्भात, पार्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी ऑगस्ट 1975 मध्ये या उद्यानात 16.37 कॅरेटचा सर्वात मोठा हिरा सापडला होता. पांढऱ्या रंगाच्या त्या चमकदार हिऱ्याचे नाव अमरिलो स्टारलाईट होते. त्याच वेळी, हिरा मिळाल्यानंतर केव्हिन म्हणाला, ‘जेव्हा मी हे पार्कमध्ये पडलेले पाहिले तेव्हा मला ते फारच आकर्षक आणि चमकदार वाटले, म्हणून मी ते उचलले व माझ्या बॅगेत ठेवले. मला सुरवातीला वाटलं की हा काचेचा तुकडा आहे. ‘ हिरा मिळाल्याच्या आनंदात केविन किन्नार्डने त्याचे नाव ‘किन्नार्ड फ्रेंडशिप डायमंड’ ठेवले.

आणि जेव्हा ड्रायव्हर बनला 15 कोटींचा मालक

दरम्यान यापूर्वी अमेरिकेच्या मिशिगनमध्येही अशाच प्रकारची घटना समोर आली होती जेव्हा एका कारकुनामुळे ट्रकचालकाने 15 कोटी रुपये जिंकले होते. वास्तविक ही व्यक्ती आपल्या ट्रकसह कुठेतरी जात होती. जाताना तो ट्रकच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी गॅस स्टेशनवर थांबला. एअर मशीनमध्ये टाला त्याला पैसे मिळवणे आवश्यक होते, जे त्याच्याकडे नव्हते. जेव्हा त्या माणसाला काहीच कळले नाही, तेव्हा त्याने जवळच्या मिशिगन लॉटरी स्टॉलकडून 10 डॉलरचे ‘लकी 7 चे स्क्रॅच-ऑफ तिकीट’ विकत घेतले. त्या ट्रकचालकाबरोबर आणखी एक खेळ झाला, खरं तर लॉटरीच्या कारकुनाने चुकून त्याला आणखी एक तिकीट दिलं. ड्रायव्हरने कारकुनाला 10 डॉलरचे तिकीट मागितले, परंतु त्याने चुकून त्याला 20 डॉलर चे तिकीट दिले. यानंतर लॉटरीचा निकाल आला तेव्हा ट्रक चालकाला समजले की त्याला 2 मिलियन डॉलर म्हणजेच 15 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.