1 जूनपासून बदलणार हे नियम, ज्यांचा होईल तुमच्यावर परिणाम; बँक व्याजदर आणि एलपीजीच्या दरात सुद्धा होणार का बदल?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – एक जून तारीख आपल्यासाठी महत्वाची आहे. नवा महिना येताच सर्वप्रथम आपले लक्ष सुट्ट्यांकडे जाते. बँकेशी संबंधीत कामांसाठी हे पहावे लागते, कारण ज्या दिवशी काम करायचे आहे त्या दिवशी सुटी आहे किंवा नाही हे समजते. अनेक बँकांनी तर काही बदलांसाठी सुद्धा 1 जूनची तारीख ठरवली आहे.

जर तुम्ही बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक किंवा सिंडिकेट बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी 1 जून तारीख महत्वाची आहे. 1 जूनपासून बँक ऑफ बडोदा ग्राहकांसाठी चेक पेमेंटसंबंधी नियम बदलणार आहे. तर कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांसाठी आयएफएससी कोड बदलणार आहे.

1 जुलैपासून बदलतील आयएफएससी कोड
कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर नमूद माहितीनुसार, 1 जुलैपासून बँकेचा आयएफएससी कोड बदलणार आहे. सिंडीकेट बँकेच्या ग्राहकांना नवीन आयएफएससी कोड 30 जूनपर्यंत अपडेट करण्याचा सल्ला दिला गेला आहे. नवीन आयएफएससी कोड जाणून घेण्यासाठी अगोदर कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. जिथे या संबंधी माहिती दिली गेली आहे. कॅनरा बँकेत सिंडीकेट बँकेचे विलिनिकरण केले आहे.

1 जूनपासून बदलणार चेकने पेमेंटची पद्धत
बँक ऑफ बडोदा ग्राहकांसाठी 1 जून 2021 पासून चेकने पेमेंटची पद्धत बदलणार आहे. फसवणूक टाळण्यासाठी बँकेने ग्राहकांसाठी पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन अनिवार्य केले आहे. पॉझिटिव्ह पे सिस्टम एक फ्रॉड पकण्याचे टूल आहे.

बँक ऑफ बडोदाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टम अंतर्गत चेकच्या डिटेल्स तेव्हा रिकन्फर्म कराव्या लागतील, जेव्हा त्यांनी 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्तचे चेक जारी केले जातील. हा नियम 1 जून 2021 पासून लागू होईल.

बँकेच्या या नव्या व्यवस्थेअंतर्गत कुणी ग्राहक जेव्हा चेक जारी करेल तेव्हा त्यांना आपल्या बँकेला पूर्ण डिटेल द्यावी लागेल. चेक पेमेंटच्या अगोदर या डिटेल्स बँक क्रॉस चेक करेल. जर यामध्ये काही गडबड आढळली तर बँक कर्मचारी तो चेक रद्द करतील.

स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर
एक जूनपासून एलपीजी म्हणजे स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर सुद्धा वाढू शकतात. सामान्यपणे प्रत्येक महिन्याला इंधन कंपन्या स्वयंपाकाच्या गॅसचे नवीन दर जारी करतात. अनेकदा तर महिन्यात दोनदा सुद्धा दर बदलले जातात.

स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम्सच्या इंटरेस्ट रेटमध्ये बदल
पीपीएफ, एनएससी, केव्हीपी आणि सुकन्या समृद्धी सारख्या स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम्सच्या व्याजदरात सुद्धा मोठे बदल या महिन्यात होणार आहेत. सरकारकडून प्रत्येक तीन महिन्याला स्मॉल सेव्हिंग्ज स्कीमचे नवीन व्याजदर लागू केले जातात. अनेकदा असे होते की, जुने व्याजदरच रिव्हाईज केले जातात.