तारण कर्जापोटी मिरजेतील बँकेचीही फसवणूक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – बेदाणा व हळदीवर तारण कर्ज दिले असताना कोल्ड स्टोअरेजमधून त्याची परस्पर विक्री करून बडोदा बॅंकेची २३ कोटी १२ लाख ७४ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी कोल्डस्टोरेज चालकांची चौकशी करण्यात येणार आहे. मुंबईतील कंपनीच्या दोन प्रतिनिधींचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अशाप्रकारे मिरजेतीलही एका बॅंकेची फसवणूक केल्याचेही समोर आले आहे.

याप्रकरणी मुंबईतील सीएनएक्‍स कार्पोरेशन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार निरुपमा पेंडूरकर, त्याच कंपनीचे पश्‍चिम विभागाचे प्रमुख अजित जाधव ( सांगली) यांच्यासह साई ऍग्रोटेक कोल्ड स्टोअरेज व राधाकृष्ण कोल्ड स्टोअरेजचे दीपक गुरव, अभ्युदया कोल्ड स्टोअरेजचे प्रद्युम्न पाटील, बीएल कोल्ड स्टोअरेजचे राहुल मित्तल, गोमटेश कोल्ड स्टोअरेजचे अनिल सुगन्नावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेदाणा व हळदीवर बॅंक ऑफ बडोदाकडून तारण कर्ज दिले जाते. बॅंक, शेतकरी, कोल्ड स्टोअरेज यांच्यात समन्वयासाठी सीएनएक्‍स कार्पोरेशन कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. या कंपनीकडून शेतकऱ्यांच्या मालाची पाहणी बॅंकेला माहिती दिली जाते. त्यानंतर कंपनीच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना बॅंकेकडून कर्ज दिले जाते. २०१७ मध्ये मिरज व तासगाव तालुक्‍यातील ४८ शेतकऱ्यांना बॅंकेकडून कर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यानुसार या शेतकऱ्यांचा माल कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यात आला होता. जानेवारी २०१९ मध्ये बॅंकेने कोल्ड स्टोअरेजमधील तारण मालाची पाहणी केली. पण कोल्ड स्टोअरेजमध्ये बेदाणा व हळद नसल्याचे बॅंकेच्या निदर्शनास आले. त्यानंतर बॅंकेने संबंधित शेतकरी व कोल्ड स्टोअरजेकडे विचारणाही केली. टाळाटाळ केल्यानंतर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला ‘बटाटा’ लावा आणि मिळवा ‘तजेलदार’ त्वचा

आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला

मुख्यमंत्र्यांची आमदारकी धोक्यात ? २३ जुलै ला फैसला !

मदरशातील मुलींवर लैंगिक अत्याचार, व्यवस्थापकासह तिघांना अटक