ICICI, कोटक महिंद्रा आणि BOB नं घेतला मोठा निर्णय ! देशातील कोटयावधी ग्राहकांवर होणार परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांत देशातील तीन प्रमुख बँकांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या तीन बँका खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा आणि सरकारीत बँक ऑफ बडोदा (बीओबी) आहेत. या निर्णयाचा परिणाम कोट्यावधी ग्राहकांवर होणार आहे. त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने आपल्या नवीन ग्राहकांच्या कर्जावरील रिस्क प्रीमियम वाढवला आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास नवीन ग्राहकांना बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेणे महाग जाईल.

याशिवाय बँकेने कर्जाच्या बाबतीत चांगल्या क्रेडिट स्कोअरचाही समावेश केला आहे. याचा अर्थ असा की ज्याच्याकडे चांगला क्रेडिट स्कोअर असेल, त्याला तितक्या कमी व्याजावर अधिक कर्ज मिळेल. तसेच कमी क्रेडिट स्कोअरवर कर्जाचे व्याज दर जास्त असेल. खासगी क्षेत्राच्या आयसीआयसीआय बँकेने शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी एक वेगळीच युक्ती केली आहे. वास्तविक उपग्रहाद्वारे घेतलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या छायाचित्रांचे मूल्यांकन केल्यानंतर बँक शेतकऱ्यांना कर्ज देत आहे. बँकेनुसार, यामुळे शेतकर्‍यांच्या आर्थिक परिस्थितीचा अचूक अंदाज येईल आणि कर्ज मंजूर होण्यासही कमी वेळ लागेल. हे तंत्र शेतकऱ्यांच्या कर्जाची मर्यादा वाढवण्यास मदत करेल.

त्याचप्रमाणे अलीकडेच आयसीआयसीआय होम फायनान्सने (आयसीआयसीआय एचएफसी) ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू केली आहे. या एफडी योजनेत व्याज दर सामान्यपेक्षा जास्त मिळत आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी देखील डेबिट कार्डची आवश्यकता नसेल. वास्तविक बँकेने एसबीआयसारखे कार्डलेस रक्कम काढण्याची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेसाठी ग्राहकांना कोटक नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग अ‍ॅपवर लॉग इन करावे लागेल. येथे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतरच तुम्ही कोड जनरेट करून कोणत्याही एटीएममधून कार्डलेस रक्कम काढू शकता.