सर्वसामान्यांना झटका ! पुढच्या महिन्यापासून तुमची ‘ही’ बँक पैसे जमा करण्यासाठी आकारेल चार्जेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपले कोणत्याही बँकेत खाते असल्यास आपल्यास ही माहिती जाणून घेणे फार महत्वाचे आहे. कारण पुढच्या महिन्यापासून बँकेचे अनेक नियम बदलणार आहेत. आपल्याला माहित आहे का की, आपली बँक आपल्याकडून बर्‍याच गोष्टींवर पैसे घेते? नसेल माहित तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, एटीएम व चेकचा उपयोग, किमान शिल्लक, एसएमएस सुविधेच्या वापरापर्यंत बँक तुमच्याकडून पैसे घेते. परंतु आता बँकांमध्ये पैसे जमा करण्यास व पैसे काढण्यासाठी ग्राहकांना फी भरावी लागणार आहे. त्याची सुरुवात बँक ऑफ बडोदाने केली आहे. यावर लवकरच बँक ऑफ इंडिया, पीएनबी, ॲक्सिस आणि सेंट्रल बँक निर्णय घेतील. पुढील महिन्यापासून म्हणजेच नोव्हेंबर 2020 पासून ग्राहक मर्यादेपेक्षा जास्त बँकिंग करत असल्यास ग्राहकांना स्वतंत्र फी भरावी लागेल.

विविध जमा पैसे काढण्याचे शुल्क
हे माहित असणे आवश्यक आहे की, चालू खाते, कॅश क्रेडिट मर्यादा आणि ओव्हरड्राफ्ट खात्यातून पैसे जमा करणे आणि पैसे काढणे आणि बचत खात्यातून जमा पैसे काढणे यासाठी बँक ऑफ बडोदाने वेगवेगळे शुल्क निश्चित केले आहेत. पुढच्या महिन्यापासून, ग्राहकांना एका महिन्यात तीन वेळेनंतर प्रत्येक वेळी पैसे काढताना कर्जाच्या खात्यासाठी 150 रुपये द्यावे लागतील.

केवळ तीन वेळा पैसे जमा करणे विनामूल्य असेल.
बचत खात्याविषयी बोलायचे म्हणले तर अशा खातेदारांना तीन वेळा पैसे जमा करणे विनामूल्य असेल, परंतु जर ग्राहक चौथ्यांदा पैसे जमा करत असेल तर त्यांना 40 रुपये द्यावे लागतील. एवढेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनाही बँकांनी कोणतीही दिलासा दिला नाही. जन धन खातेधारकांना यातून थोडा दिलासा मिळाला. त्यांना ठेवीवर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, परंतु पैसे काढताना 100 रुपये द्यावे लागतील.

कोणत्या खात्यावर किती शुल्क आकारले जाईल
>> जर सीसी, चालू आणि ओव्हरड्राफ्ट खातेधारकांनी दररोज एक लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा केली तर ही सुविधा विनामूल्य असेल. परंतु जर आपण यापेक्षा अधिक रक्कम जमा केली तर बँका तुमच्याकडून पैसे घेतील.

>> खातेधारकांकडून एक लाखाहून अधिक जमा करण्यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाईल. यासाठी किमान आणि कमाल मर्यादा अनुक्रमे 50 आणि 20 हजार रुपये आहेत.

>> सीसी, चालू आणि ओव्हरड्राफ्ट खात्यांमधून महिन्यातून तीन वेळा पैसे काढले गेले तर ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

>> चौथ्यांदा पैसे काढण्यावर 150 रुपये शुल्क आकारले जाईल.

बचत खातेधारकांसाठी इतकी फी असेल
बचत खाते धारकांसाठी तीन वेळा मुदत ठेव विनामूल्य असेल. परंतु, चौथ्यांदा खातेदारांना प्रत्येक वेळी पैसे जमा करताना 40 रुपये द्यावे लागतील. पैसे काढण्याबद्दल बोलायचे म्हणले तर, ग्राहकांकडून दरमहा तीन वेळा खात्यातून पैसे काढल्यावर शुल्क आकारले जाणार नाही. परंतु चौथ्यांदा ग्राहकांना प्रत्येक वेळी 100 रुपये देणे बंधनकारक असेल.

You might also like