छोटया व्यापार्‍यांना मोठा दिलासा ! सरकारच्या आदेशावरून ‘ही’ बँक देतीय मदत म्हणून उधारीवर पैसे

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   लॉकडाऊनमुळे त्रस्त MSME (Micro, Small and Medium Enterprises) सेक्टरला कर्ज पुनर्रचना, क्रेडिट लिमिटमध्ये वाढ आणि व्याज पेमेंटसाठी मोरेटोरियम यासारख्या सुविधा मिळू शकतात. अर्थ मंत्रालयाच्या सूचनेनुसार बँकांनी यासाठी तयारी सुरू केली आहे. बँक ऑफ बडोदाने तर छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी खास कोविड इमर्जन्सी क्रेडिट देखील सुरू केले आहे. त्याअंतर्गत कोरोनाशी सामना करण्यासाठी एमएसएमईला अधिक रोख देण्याची योजना आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या सर्व ४९ हजार एमएसएमई ग्राहकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

बँकेच्या व्याज पेमेंटसाठी मोरेटोरियम देण्याचीही तयारी

बँक ऑफ बडोदाच्या विशेष कोविड इमर्जन्सी क्रेडिट योजनेत लघु उद्योजकांना कर्ज पुनर्रचनेचा लाभ मिळेल. यात कंपन्यांच्या क्रेडीट लिमिटला वाढवण्याचीही योजना आहे. तसेच बँकेच्या व्याज पेमेंटसाठी मोरेटोरियम देण्याचीही तयारी बँक करत आहे.

लॉकडाऊनमुळे छोट्या व्यापाऱ्यांना मोठे नुकसान

महत्त्वाचे म्हणजे कोविड १९ चे संक्रमण रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे देशाच्या एमएसएमईवर फार वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या मते, अशा वेळेला सामोरे जाण्यासाठी एमएसएमईला सॉफ्ट लोन, कॅश ट्रान्सफर आणि कर्ज पुनर्रचनेची आवश्यकता आहे.

लॉकडाऊनचा रोजंदारीवर असलेल्या मजुरीवरील जीवनावर देखील फार वाईट परिणाम होणार आहे. वाहतूक बंद असल्यामुळे ते लोक घरीही जाऊ शकत नाहीत. अर्थव्यवस्थेत असंघटित क्षेत्राचा एक मोठा वाटा आहे. हे क्षेत्र नोटाबंदी आणि जीएसटीच्या धक्क्यातून अजून सावरले नव्हते की आता कोरोनाचे नवे संकट उभे राहिले आहे. लॉकडाऊनमुळे छोटे व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर पोहोचू शकतात.