ALERT ! बँक ऑफ बडोदानं ग्राहकांना दिली PASSWORD बाबतची महत्वाची सूचना, आता ‘हे’ रंग लक्षात ठेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) या बँकेने पासवर्ड संदर्भात एक सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना बँकेने दिली आहे. तर सध्या बँकेचे सर्व व्यवहार ऑनलाइन सुरु आहे. कोरोना काळात याचा फायदा होत आहे. Credit Card, Debit Card, आणि ATM यावरून सर्व कॅशलेस व्यवहार होत असतात. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा पासवर्ड आणि पिन क्रमांक लक्षात असणं आवश्यक असत. याबरोबरच पासवर्ड आणि पिन क्रमांक सुरक्षित करणे सुद्धा महत्वाचे आहे.

बँकेने यासंदर्भात ट्वीटद्वारे माहिती दिली आहे, बँकेने Debit, credit किंवा ATM card तसेच ऑनलाइन बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांसाठी पासवर्ड आणि विशिष्ट रंग याबद्दल ही सूचना दिली आहे. ग्राहकाचा पासवर्ड किती सुरक्षित आहे, याची सूचना हिरवा (Green Color), पिवळा (Yellow Color) आणि लाल (Red Color) हे रंग देतात. असे सविस्तर बँकेने सांगितलं आहे. तसेच, सर्वच बँकांच्या संदर्भात ही रंगाची सूचना लागू केली आहे. यादरम्यान, ग्राहकांनी दिलेल्या पासवर्डला हिरवा रंग आला तर तो पासवर्ड अत्यंत सुरक्षित असतो. पिवळा रंग आल्यास त्याची सुरक्षितता मध्यम असते, तर लाल रंग आल्यास तो पासवर्ड फारसा सुरक्षित नाही. तर ग्राहकांनी सुरक्षित पासवर्डसाठी कॅपिटल आणि स्मॉल अशा दोन्ही प्रकारातील अक्षरे, स्पेशल कॅरेक्टर्स आणि आकडे यांचा समावेश करून पासवर्ड तयार करावा लागेल.

बँकेची नवी सुविधा 
बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी आता १ नवीन सुविधा आणली आहे. आता बँकेच्या ग्राहकांना What’s app वर आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी आपल्या नोंदणीकृत मोबाइलवरून बँकेच्या (8433888777) या मोबाइल क्रमांकावर हाय (Hi) असा मेसेज पाठवने आवश्यक आहे. त्यानंतर What’s app चॅटद्वारे ग्राहकांना आपल्या बँक खात्याबाबत हवी असलेली संपूर्ण माहिती मिळणार आहे.

हिरवा रंग (Green Color) दिसल्यास पासवर्ड अधिक सुरक्षित 
पासवर्ड तयार केल्यावर हिरवा रंग (Green Color) आल्यास तो अतिशय सुरक्षित असतो तर कुणीही सहजासहजी हा पासवर्ड हॅक करू शकत नाही. लाल रंग (Red Color) आल्यास तो पासवर्ड अगदी सोपा असल्यानं कोणीही सहज हॅक करू शकेल. तसेच पिवळा रंग (Yellow Color) आल्यास पासवर्डची सुरक्षा मध्यम स्वरूपाची असते. लाल आणि पिवळा रंग आल्यास दोन्ही पासवर्डसमधील कॅरेक्टर्समध्ये बदल करून तो जास्त कठीण करणे आवश्यक आहे. तर त्याची सुरक्षितता अधिक चांगली होईल.