Bank of Baroda ने सुरु केली नवी सुविधा, 30 मिनिटांत मंजूर होणार Home Loan, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशातील तिसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) स्वतःचे डिजिटल लेन्डिंग प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. याद्वारे आपण आपल्या वेळ आणि स्थानानुसार काही मिनिटांत ऑनलाइन प्रक्रियेद्वारे कर्ज मिळवू शकता. बँक ऑफ बडोदाचे (Bank of Baroda)  कार्यकारी संचालक विक्रमादित्य सिंह खिनी म्हणाले की, गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जासाठी ग्राहकांना होणार्‍या अडचणी लक्षात घेता बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda)  ही सुविधा सुरू केली आहे. त्यांच्या मते, या व्यासपीठाच्या सहाय्याने गृहकर्ज, कार कर्ज आणि ग्राहकांचे वैयक्तिक कर्ज अर्ज 30 मिनिटांत मंजूर केले जातील. जाणून घेऊया या सुविधेचा कसा मिळेल फायदा..

किरकोळ खरेदीवरही करू शकतो EMI –
जर आपण बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल, तर आपण किरकोळ खरेदीसाठीही प्री- अ‍ॅप्रूव्ड माइक्रो पर्सनल लोन घेऊ शकता. हे कर्ज अवघ्या 60 सेकंदात बँक ऑफ बडोदाच्या अ‍ॅप एम-कनेक्टद्वारे मंजूर होईल. तसेच , तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमच्या बचत खात्यातही ही रक्कम मागवू शकता. याद्वारे ही रक्कम परत करण्यासाठी बँक ऑफ बडोदा 3 ते 18 महिन्यांचा ईएमआय पर्याय देखील देईल.

अर्ध्या तासात होणार लोन अ‍ॅप्रूव्ड –
बीओबीच्या नवीन डिजिटल लेन्डिंग प्लँटफॉर्मच्या माध्यमातून अर्ध्या तासात गृह कर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज मंजूर केले जाईल. कर्ज अर्जदाराच्या आर्थिक प्रोफाइलच्या विविध स्त्रोतांद्वारे डिजिटल कर्ज प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. बीओबीच्या या नवीन फीचरचा लाभ वेबसाइट, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून मिळू शकेल.

FD च्या आधारे त्वरित उपलब्ध होणार कर्ज –
मुदत ठेवींविरूद्ध (एफडी), बँक कर्जदेखील देत आहे, अर्थात ज्या ग्राहकांचे बँकेत एफडी आहे ते मोबाइल बँकिंग किंवा नेट बँकिंगद्वारे त्वरित कर्ज घेऊ शकतात.