खुशखबर ! ‘या’ सरकारी बँकेची ग्राहकांना दिवाळी भेट, गृह आणि वाहन कर्ज झाले ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळी आधी सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना गिफ्ट दिले आहे. बँकेने आपले व्याज दर रेपो दराला जोडल्यानंतर व्याज दरात घट केली आहे. यामुळे बँकेने 0.25 टक्क्याने व्याजदरात कपात केली आहे. यामुळे गृह आणि वाहन कर्जासह सर्व कर्ज स्वस्त झाले आहे. आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला. जेणे करुन व्याजदर कपातीचा फायदा ग्राहकांना मिळेल.

4 ऑक्टोबरला आरबीआयने आपल्या रेपो दरात 0.25 टक्क्याने कपात केली होती. आरबीआयची ही लागोपाठ 5 वी कपात आहे. यामुळे रेपो दर 5.15 टक्के झाला आहे.

0.25 टक्के व्याज दरात कपात –
बँकेकडून सांगण्यात आले की बँकेने व्याज दरात 0.25 टक्के कपात केली आहे. नवे दर गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैक्यतिक कर्ज या सर्वावर लागू होईल. बँकेने सांगितले की गृह कर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजदर 8.10 टक्क्यांपासून 8.60 टक्के असतील.

आरबीआयने जीडीपी ग्रोथ ची शक्यता कमी केली –
आबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी रिझर्व बँकेने आर्थिक वर्ष 2019 – 20 दरम्यान जीडीपी ग्रोथ रेडचे अनुमान 6.9 टक्क्यांनी कमी करुन 6.1 केले. या आधी ऑगस्टमध्ये रिझर्व्ह बँकचे ग्रोथचे अनुमान 7.0 टक्क्यांनी कमी होऊन 6.9 टक्के झाले होते.

Visit : Policenama.com