BOB सह ‘या’ 3 बँकांनी दिली नवीन वर्षाची भेट, कोट्यावधी ग्राहकांना होणार फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षात जर तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. बँक ऑफ बडोदासह 3 बँकांनी ग्राहकांंना भेट दिली आहे. याअंतर्गत कर्जावर घेण्यात येणारे व्याज कमी करण्यात आले आहे.

बँक ऑफ बडोदाकडून सांगण्यात आले की 12 जानेवारीपासून एक महिन्याच्या कालावधीसाठी आपला एमसीएलआर दर 7.65 टक्क्यांनी कमी करुन 7.60 टक्के केला आहे. बँकेकडून सांगण्यात आले की, इतर कालावधी दर पहिल्याप्रमाणे असतील.

याच प्रकारे बँक ऑफ बडोदाने 1 महिन्याच्या कालावधीसाठी MCLR 7.60 टक्के, तीन महिन्यासाठी 7.80 टक्के, 6 महिन्यासाठी 8.10 टक्के आणि 1 वर्षासाठी 8.25 टक्के केला होता.

युनियन बँक ऑफ इंडियाने वेगवेगळ्या मॅच्युरिटीच्या कालावधीसाठी कर्जावर मार्जिनल कॉस्ट लेडिंग रेट म्हणजेच एमसीएलआर आधारित व्याज दरात 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे. बँकेचे नवे दर 11 जानेवारीपासून लागू होतील.

नव्या बदलांतर्गत 1 वर्ष कालावधीसाठीच्या कर्जाचे दर 8.10 टक्के असेल. जुलै 2019 नंतर बँकेने व्याजदरात कपात केली आहे.

ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकेने MCLR मध्ये 0.05 ते 0.15 टक्के कपात केली आहे. बँकने 1 वर्षात एमसीएलआरला 0.15 टक्के कमी करुन 8.15 टक्के केले आहे. बँकेच्या या निर्णयाने गृह कर्ज आणि वाहन कर्ज पहिल्याच्या तुलनेत स्वस्त होणार आहेत. याचबरोबर व्याजदरात देखील दिलासा मिळेल.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/