‘बँक ऑफ बडोदा’मध्ये स्पेशलिस्ट IT प्रोफेशनल पदांसाठी भरती

मुंबई : वृत्तसंस्था – बँक ऑफ बडोदाने स्पेशालिस्ट आयटी प्रोफेशनल पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात. हे अर्ज भरण्यासाठीची अंतिम तारीख २ सप्टेंबर असणार आहे.

या पदांसाठी भरती –
डाटा अ‍ॅनालिस्ट – १ जागा
डेटा मॅनेजर – २ जागा
डाटा इंजिनियर – ४ जागा
बिजनेस अ‍ॅनालिस्ट – २ जागा
मोबिलिटी अ‍ॅंड फ्रंट अ‍ॅंड डेवलपर – ६ जागा
एकीकरण विशेषज्ञ – २ जागा
इमर्जिंग टेक्नोलॉजी एक्सपर्ट – ४ जागा
टेक्नोलॉजी आर्किटेक्ट – १

नोकरी स्थान – मुंबई

शैक्षणिक योग्यता – कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून पदवीधर, पद्युत्तर, बी. टेक बी. ई असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – २ सप्टेंबर २०१९
अर्ज करण्याची प्रक्रिया –
१) अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in जाऊन तुम्हाला हा अर्ज भरावा लागेल.
२)  येथील करियर सेक्शनवर जाऊन तेथे क्लिक करा.
३) तेथे दिलेल्या ‘Recruitment of IT professionals टॅबवर क्लिक करा.
४) अर्ज पूर्णता भरुन घ्या, माहिती तपासून सबमिट करा.
५) यानंतर तुम्ही परिक्षा शुल्क भरु शकतात आणि त्याची प्रिंटआऊट घेऊ शकतात.

आरोग्यविषयक वृत्त