Bank of Baroda Recruitment 2021 : पदवीधरांची 511 पदांवर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : बँक ऑफ बडोदामध्ये वेल्थ मॅनेजमेंट डिपार्टमेंटमध्ये ह्यूमन रिसोर्स (एचआर) पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे, ज्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. ज्या उमेदवारांनी अजूनपर्यंत या भरतीसाठी अर्ज केला नसेल ते 29 एप्रिल, 2021 पर्यंत आपले रजिस्ट्रेशन करू शकतात. उमेदवारांना सर्व आवश्यक माहिती जारी नोटिफिकेशनमध्ये चेक करावी लागेल. इच्छुकउमेदवार बँक ऑफ बडोदाची अधिकृत साइटवर जाऊन नोटिफिकेशन डाउनलोड करावे आणि अ‍ॅप्लाय करावे.

असे करा अप्लाय
स्टेप 1: अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जा.
स्टेप 2: होमपेजवरील ’करियर’ लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: एक नवीन पेज उघडेल जिथे नोटिफिकेशनसह दिलेल्या रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
स्टेप 4: आपल्या आवश्यक डिटेल्स नोंदवून रजिस्टर करा आणि अ‍ॅप्लिकेशन फी भरा.
स्टेप 5: भरलेल्या फॉर्मची एक कॉपी आपल्याकडे सेव्ह करा.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 600/- रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्गासाठी शुल्क 100/- रुपये आहे. रजिस्ट्रेशनची प्रक्रिया 09 एप्रिल, 2021 ला सुरू झाली होती. या भरती अभियानाच्या माध्यमातून एकुण 511 रिक्त पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांना अ‍ॅप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे भरून आणि जमा करण्यासाठी आवश्यक अर्ज शुल्क सुद्धा जमा करावे लागेल. पात्रतेसह अन्य माहिती नोटिफिकेशनमध्ये आहे.

नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
https://www.bankofbaroda.in/writereaddata/Images/pdf/WMS-Detailed-Advertisement-FINAL09-04-2021.pdf