बँक ऑफ बडोदाकडून मोठी घोषणा ! 1 मार्चपासून होणार ‘हे’ मोठे बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  राष्ट्रीयीकृत बँकांपैकी एक असलेल्या ‘बँक ऑफ बडोदा’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या 1 मार्चपासून बँक आपल्या IFSC Code मध्ये बदल करत आहे. त्यामुळे जर तुम्ही देना बँक किंवा विजया बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला या बदलाची नोंद घ्यावी लागले.

विजया बँक आणि देना बँक या दोन बँकांचे बँक ऑफ बदोडा बँकेत विलिनीकरण झाले होते. त्यानुसार विजया बँक आणि देना बँकेच्या बहुतांश ग्राहकांना नवा अकाउंट नंबर आणि इतर कागदपत्रे दिली गेली. मात्र, आता बँकेकडून 1 मार्चपासून नवे IFSC Code लागू केले जाणार आहेत. ज्या लोकांना नवे IFSC Code माहिती नसतील तर त्यांनी त्याची नोंद करून घ्यावी. जर खातेदाराने याची नोंद घेतली नाहीतर अशा खातेदारांना पैसे ट्रान्सफरसारखे व्यवहार करता येणार नाहीत.

बँकेने ट्विट करून दिली माहिती

बँकेने ट्विट करून याबाबतची माहिती दिली. यामध्ये सांगितले, की 1 मार्च, 2021 नंतर ग्राहकांचे जुने IFSC Code चा वापर करता येणार नाही. ई-विजया आणि देना बँकेच्या शाखांकडून नवा IFSC Code घ्यावा. तसेच दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे आणि बँकिंग सेवेचा लाभ घ्या.

या बँकांचेही IFSC Code बदलणार

पंजाब नॅशनल बँकने ट्विट करून माहिती दिली, की ओरिएंटल बँक ऑफ कॉर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांचे जुने चेकबुक आणि IFSC/MICR कोड फक्त 31 मार्चपर्य़ंतच कार्यान्वित राहतील.