खुशखबर ! आता घरगुती सामान घेतल्या सारखं ‘या’ बँकेकडून कर्ज घ्या, बँकेकडून ‘ई-कॉमर्स’ प्लॅटफॉर्म

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बँक ऑफ बडोदाने आपले ई – कॉमर्स पोर्टल लॉन्च करण्याची योजना बनवली आहे. या पोर्टलवरुन ग्राहक बँकिंग सेवेशिवाय शेती संबंधित उत्पादनांची खरेदी करु शकणार आहे. याशिवाय विशेष म्हणजे तुम्ही घर बसल्या ऑनलाइन कर्ज घेऊ शकणार आहेत. बँक यासाठी तयारी करत आहे. बँकेचा उद्देश आहे की बँकेच्या ग्राहकांना या पोर्टलवरुनच विविध सुविधा उपलब्ध होतील.

ई – कॉमर्स प्लॅट फार्मवरून घेऊ शकतात कर्ज –
बँकेकडून सांगण्यात आले आहे की, या ई – कॉमर्स प्लॅटफार्मवर विविध प्रकारच्या बँकिंग सेवांबरोबरच शेती संबंधित उत्पादनांची विक्री करण्यात येईल. ग्राहकांना ई – कॉमर्स पोर्टलवरुन शेती कर्ज, फार्म मशीनरी कर्ज, शेतीची उपकरणे, वीज आणि खतांसाठी कर्ज घेता येईल. याच पोर्टलवरुन सोन्यावर कर्ज, सर्व वीमा उत्पादन, गुंतवणूक संबंधित गोल्ड बॉन्ड आणि गुंतवणूकीसाठी सर्व उप्तादने उपलब्ध असतील.
बँकेचा भर हा आहे की या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांना त्यांच्या आवश्यक गोष्टी उपलब्ध करुन देणे. यासाठी बँकेने शेती कर्ज देखील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे.

बँक करणार ई – कॉमर्स पॅल्टफॉर्म तयार –
बँक ऑफ इंडियांने ई – कॉमर्स पोर्टल लॉन्च करण्यासाठी अशा सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून निवेदन मागवले आहे. बँकेकडून सांगण्यात आले की, ते एक असा प्लॅट फार्म लॉन्च करुन इच्छित आहेत ज्यातून त्यांच्या ग्राहकांना दररोज लागणाऱ्या सुविधा उपलब्ध होतील. यासाठी बँकेला असा पार्टनर आवश्यक आहे जो डिजिटल कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मची सेवा उपलब्ध करुन देईल. यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत, या निविदांसाठीची अंतिम तारिख २६ जुलै २०१९ असणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त

साजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे

अवेळी मासिक पाळी येण्याची ‘ही’ ४ प्रमुख कारणं, ‘ही’ काळजी घ्या

चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या

झोप न येण्या मागं ‘ही’ कारणं, ‘ही’ काळजी घ्या

डोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’

गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय