खुशखबर ! ‘SBI’नंतर ‘या’ सरकारी बँकेने केली ‘व्याज’ दरात कपात, सर्व ‘कर्ज’ होणार ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँका असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आणि बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना गिफ्ट दिले आहे. BOI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये ०.१५ टक्क्यांने कपात केली आहे. हे नवे दर १० ऑगस्टपासून म्हणजेच शनिवारपासून लागू होतील. SBI ने देखील लागोपाठ ४ थ्यांदा रेपो रेट मध्ये कपात केली आहे. रेपो रेटने कपात केल्यानंतर सर्वात आधी SBI ने व्याजदरात कपात केली आहे.

SBI ने आपल्या व्याज दरात फेब्रुवारीनंतर जवळपास १.१० टक्क्याने कपात केली आहे. त्यानंतर बँकेने या व्याजदरांचा लाभ लगेचच आपल्या ग्राहकांना हंस्तातरित केला. MCLR मध्ये कपात करण्यात आल्यानंतर सर्वात मोठा फायदा हा होणार आहे की, लोकांना सध्याचे कर्ज स्वस्त होणार आहे.

कर्ज झाले स्वस्त –

कपातीनंतर 1 वर्षांच्या कालावधीसाठी असलेल्या कर्जासाठी MCLR दर ८.५० टक्के झाला आहे. बँकच्या १ दिवस आणि एक महिना कालावधीच्या कर्जासाठी कर्जाचे दर कमी होऊन क्रमश: ८.१० टक्के आणि ८.२० टक्के होणार आहे. बँकेचे ३ महिने आणि ६ महिन्याच्या कालावधीचे व्याजदर ०.१५ टक्के कपात करुन ८.३५ आणि ८.४० टक्के करण्यात आले आहे.

काय आहे MCLR –

MCLR ला मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट देखील म्हणले जाते. यात बँक आपल्या फंडानुसार कर्जाचे दर ठरवते. हे बेंचमार्क दर असतात. त्यात वाढ झाल्या बँकेच्या सर्व व्याजदरात कपात होते. तर कमी आल्यास बँकच्या सर्व व्याजदरात वाढ होते.

आरोग्यविषयक वृत्त