बँक ऑफ इंडियाला २९३ कोटींचा गंडा घालणाऱ्या आरोपीचा वर्षभरापुर्वीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बनावट लेटर ऑफ क्रेडीटचा वापर करून बँक ऑफ इंडियाला २९३ कोटींचा गंडा घालणाऱ्या श्रीकांत सवाईकर यांचा एका वर्षापुर्वीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सवाईकर यांचा २२ मे २०१८ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ईडीने पुण्यासह सांगलीत त्याच्या कंपनीवर काल छापे घातले होते.

सवाईकरने २० वर्षांपुर्वी वॅरॉन अल्यूमिनियम ही कंपनी स्थापन केली होती. त्याने बँक ऑफ इंडियाच्या पुण्यातील कर्वे रोड येथील शाखेतून २९३ कोटी रुपयांचे कर्ज बनावट लेटर ऑफ क्रेडीटच्या माध्यमातून घेतले होते. त्याच्या वॅरॉन अल्यूमिनियम आणि वॅरॉन ऑटो प्रा. लि. नानाच्या दोन कंपन्यांसाठी हे कर्ज घेतले होते.त्याच्या मृत्यूनंतर आता त्याचा मुलगा व्यंकटेश सवाईकर हा काम पाहतो.

इडीने यापुर्वी चौकशीची माहिती दिली नव्हती. मात्र काल इडीकड़ून वॅरॉन ग्रुपच्या कंपनी कार्यालये आणि संचालक सवाईकरच्या घराची तपासणी केली. त्यावेळी श्रीकांत सवाईकरच्या मुलाचीदेखील चौकशी केली.