बँक आपल्या दारी ! ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर ‘BOI’ची सेवा

लोणी काळभोर पोलिसनामा (शरद पुजारी) – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्स ठेवणे आवश्यक असल्याने थेऊर येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने बँक आपल्या दारी ही सुविधा उपलब्ध करून दिली असून यामध्ये बँकेतून पैसे काढणे व बँकेत पैसे टाकणे या दोन्ही सुविधा पुरविण्यात आल्या आहेत अशी माहिती बँक ऑफ इंडिया थेऊर शाखेचे व्यवस्थापक अंकुश पाटील यांनी दिली.

कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असताना बॅंकेतील कर्मचाऱ्यांनाही याचा धोका आहे कारण ग्राहक बँकेत दररोज पैसे भरणे तसेच काढण्यासाठी येत असतो. अलिकडे ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे अनेक खातेदारांच्या खात्यात शासनाकडून पैसे वर्ग झाल्याने अडचणीच्यावेळी पैसे काढण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहे.यावर उपाय म्हणून बँक आपल्या दारी ही अभिनव कल्पना थेऊर शाखेने अमलात आणली यासाठी ग्राहकमित्र चंद्रकांत निंबाळकर व ग्रामपंचायतच्या एखाद्या कर्मचाऱ्याची मदत घेतली जात आहे.या शाखे अंतर्गत येणारी कोलवडी थेऊर कुंजीरवाडी नायगाव या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे.यासाठी ग्राहकांचा आधार कार्ड नंबर आवश्यक आहे