खुशखबर ! बँक ऑफ महाराष्ट्राकडून ग्राहकांना दिवाळी भेट, घर आणि वाहन कर्जाचा व्याजदरात कपात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजिक क्षेत्रातील बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेटमध्ये 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे. एका वर्षाच्या MCLR दर आता 8.40 टक्के असेल. हे नवे दर 8 ऑक्टोबर पासून लागू होतील.

एका दिवसापासून 6 महिन्यांपर्यंतच्या कर्जावर एमसीएलआरमध्ये 0.10 ने कपात करुन 8.05 ते 8.30 टक्के केले आहे. बँकेने रेपो दराशी जोडलेल्या दराला 8 ऑक्टोबरपासून 0.25 टक्के कमी करुन 8.45 ते 8.20 टक्के केले. बँकेने आपल्या आधार दराला वार्षिकी 9.50 टक्के मात्र कायम ठेवले.

ओबीसी आणि एसबीआयने देखील केली कर्जाच्या दरात कपात
आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि SBI या बँकांनी देखील आपल्या ग्राहकांनी गिफ्ट दिले. या बँकांनी देखील एमसीएलआर मध्ये कपात केली. यामुळे गृह कर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झाले.

काय आहे एमसीएलआर
बँकेच्या एमसीएलआरमध्ये त्यांच्या फंडाचा खर्च दिलेला असतो, ज्याला बँक दर महिन्याला घोषित करते. करंट अकाउंट आणि सेविंग अकाउट डिपॉजिट चांगल्या स्थितीत असल्याने छोट्या बँकांच्या तुलनेत मोठ्या बँकांचे एमसीएलआर कमी असतो. एमसीएलआरला इंटरनल बेंचमार्क मानण्यात येते कारण कमी खर्च असलेले फंड जमा करण्यासाठी बँकेच्या आपल्या क्षमतेच एमसीएलआर एक महत्वाचा फॅक्टर असतो.

अनेक बँका एमसीएलआरवर उधार देतात. गृह कर्जाचे व्याज दर एकतर एमसीएलआरच्या बरोबर असतील किंवा त्यापेक्षा जास्त असतात. एमसीएलआर वाढवणे म्हणजे कर्ज घेणाऱ्याला जास्त व्याज आणि ईएमआय (EMI) द्यावा लागतो.

एमसीएलआरमध्ये कसे निश्चित होतात लेंडिंग रेट
जेव्हा गृह कर्जाची मर्यादा पूर्ण होत नाही तो पर्यंत ईएमआय स्थिर राहतो, अशा कर्जात प्रिंसिपल रिपेमेंटच्या तुलनेत सुरुवातीच्या वर्षात इंटरेस्टचा हिस्सा जास्त असतो. एमसीएलआर लोनमध्ये बँक एक मार्क अप, स्प्रेड किंवा मार्जिन चार्ज लावू शकतो.

Visit : Policenama.com 

You might also like