Bank of Maharashtra | महाराष्ट्र बँकेने 5 वर्षात बड्या थकबाकीदारांचे 10 हजार 130 कोटी केले राईट ऑफ; 100 कोटींपेक्षा अधिक कर्ज घेतल्यांकडून केवळ 9 % वसुली

पुणे (Pune) : पुण्यात मुख्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राने (Bank of Maharashtra) गेल्या ५ वर्षात शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेतलेल्या बड्या थकबाकीदारांचे १० हजार १३० कोटी रुपयांचे कर्ज राईट ऑफ (Debt right off) केले आहे. त्यापैकी केवळ ९ टक्के म्हणजे ९३० कोटी रुपयांची आजतागायत वसुली झाली आहे. त्याचवेळी या बड्या थकबारीदारांची नावे जाहीर करण्यास मात्र बँकेने नकार दिला आहे.

बँकांच्या कर्जाचे टेक्निकल राईट (Technical right of loan) ऑफवरुन मध्यंतरी खूप गदारोळ झाला होता. टेक्निकल राईट ऑफ (Technical right off)  म्हणजे कर्जमाफी नाही. या कर्जांची वसुली सुरच राहते. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी बँकेच्या सर्व साधारण सभेत दरवर्षी १०० कोटींच्या वर थकीत कर्ज असलेल्या आणि तांत्रिकदृष्ट्या राईट ऑफ केलेल्या कर्ज खात्याची नावे मागितली होती. आणि त्या प्रत्येक कर्जाची टेक्निकल राईट ऑफ (Technical right of loan) केलेल्या प्रत्येक वर्षात किती वसुल झाली याची माहिती मागितली होती.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या ५ वर्षात बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank of Maharashtra) बड्या कर्जदारांचे १० हजार १३० कोटी रुपये टेक्निकल राईट ऑफ केले. मात्र ३१ मार्च २०२१ पर्यंत त्यातील फक्त ९३० कोटी रुपयांची वसुली बँक करु शकली आहे. मात्र या बड्या कर्जदारांची नावे त्यांना गोपनीयतेच्या नावाखाली देण्यात आलेली नाहीत. त्याचवेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) गेल्या वर्षी त्यांना २२५ बड्या कर्जदारांची नावे दिली होती. बँकांची गोपनीयतेची व्याख्या आणि निकष हे बँकेनिहाय वेगळे असतात का असा प्रश्न वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.

बँकेने १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जदारांचे कर्ज केले राईट ऑफ (कोटी रुपये)

वर्ष                   राईट ऑफ केलेले कर्ज रिकव्हरी
२०२०-२१                ३००२ ५४४
२०१९-२०                ३५३९ १३६
२०१८ – १९              २०९६ १२४
२०१७ -१८               १०२४ १
२०१६ – १७              ४६६ १२१

हे देखील वाचा

OBC Reservation | ओबीसी आरक्षणाला भाजपचा नेहमीच विरोध; एकनाथ खडसेंची भाजपसह देवेंद्र फडणवीसांवर टीका

परमबीर सिंग 5 मेपासून दिर्घकालीन रजेवर, तर्कवितर्कांना उधाण

Jobs | मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी पदभरती; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Bank of Maharashtra writes off Rs 10,130 crore of arrears in 5 years; Only 9% recovered from borrowers over Rs 100 crore

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update