बँक ऑफ महाराष्ट्रच्या ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या जामीन अर्जास सरकारी वकीलांचा विरोध

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

अधिकाराचा गैरवापर करुन बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना कर्ज दिल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना पुणे पोलिसांनी अटक केली. याप्रकरणात रवींद्र मराठे यांना जामीन मंजुर झाला आहे. मात्र, जे अधिकारी अटकेत आहेत त्यांच्या जामीन अर्जास विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी विरोध केला आहे.

बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी यांना नियमबाहय कर्ज दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे तसेच डी. एस. कुलकर्णी लि.चे उपाध्यक्ष  राजीव नेवासकर, सनदी लेखापाल घाटपांडे  यांच्या जामीन अर्जावर पोलिसांकडून त्यांचे लेखी  म्हणणे (से) गुरूवारी (दि.२८) विशेष न्यायालयात सादर करण्यात आला. पोलिसांकडून काही अटी आणि शर्थींवर जामीन देण्यात यावा, असे म्हणणे न्यायालयात सादर करण्यात आले. मात्र, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी अटक आरोपींच्या जामीन अर्जास विरोध केला आहे.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’705b81e8-7ae3-11e8-a830-2729ce77809a’]

पोलिसांकडून सादर करण्यात आलेले म्हणणे सकारात्मक असले तरी सरकारी वकिलांकडून न्यायालयात घेण्यात आलेल्या भूमिकेमुळे पेच निर्माण झाला आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात गुप्ता, मुहनोत, देशपांडे, नेवासकर, घाटपांडे यांच्या वकिलांनी जामीन अर्ज सादर केला आहे. गुप्ता, मुहनोत, देशपांडे यांच्यावतीने अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, घाटपांडे यांच्या वतीने अ‍ॅड. एस. के. जैन, नेवासकर यांच्याकडून अ‍ॅड. रोहन नहार यांनी जामीन अर्ज सादर केला आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना काही अटी आणि शर्थींवर न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गुप्ता, मुहनोत, घाटपांडे यांना ही जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती अ‍ॅड. निंबाळकर यांनी न्यायालयाकडे केली.
[amazon_link asins=’B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’75293638-7ae3-11e8-b2f4-416897e12fcb’]

अ‍ॅड. जैन आणि अ‍ॅड. नहार हे शुक्रवारी (२९ जून) न्यायालयात युक्तीवाद करणार आहे. दरम्यान, सनदी लेखापाल सुनिली घाटपांडे यांची अटक बेकायदेशीर असल्याचे अ‍ॅड. जैन यांनी न्यायालयात सांगितले. पोलिसांकडून गुप्ता, मुहनोत, देशपांडे, नेवासकर, घाटपांडे यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात लेखी म्हणणे सादर केले. आरोपींकडून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांना काही अटी आणि शर्थींवर जामीन देण्यात यावा, असे म्हणणे पोलिसांकडून लेखी स्वरूपात न्यायालयात सादर करण्यात आले आहे. दरम्यान, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी आरोपींना जामीन देऊ नये, असे न्यायालयात सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यापूर्वी विशेष न्यायालयाकडून तीन आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत, असे अ‍ॅड. चव्हाण यांनी न्यायलयात सांगितले. पोलिसांकडून लेखी स्वरूपात मांडण्यात आलेले म्हणणे तसेच सरकारी वकिलांची भूमिका वेगळी असल्याने बचाव पक्षाच्या वकिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गुप्ता, मुहनोत, देशपांडे, घाटपांडे, नेवासकर यांना विशेष न्यायालयाने १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.