सांगलीत जिल्हा बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या लिंगनूर (ता. मिरज) शाखेतील अधिकाऱ्याने बुधवारी सांगलीत विष पिवून आत्महत्या केली. विष्णू अण्णाप्पा गावडे (वय 47) असे मृताचे नाव आहे. शहरातील कॉलेज कॉर्नर येथील हॉटेल अक्षरम येथे दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

गावडे लिंगनूर (ता. मिरज) येथे कुटूंबासह रहात होते. त्याच गावात जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. त्याठिकाणी ते पासिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ते घरातून गेले होते. सलगरे शाखेत काही काम असल्याचे त्यांनी घरी सांगितले होते. मात्र, ते तेथे गेलेच नाही. ते सांगलीत अक्षरम लॉजवर आले. दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी जेवण केले. त्यानंतर रिकाम्या प्लेट नंतर उचलण्यासाठी सांगितले. त्यामुळे अडीचच्या सुमारस एक वेटर तेथे गेला. त्याने दरवाजा वाजवला, मात्र आतून आवाज आला नाही.

हॉटेल व्यवस्थापनाच्या लोकांनी खिडकीतून पाहिले. त्यावेळी ते बेशुद्ध असल्याचे दिसून आले. हॉटेलमधील लोकांनी दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात नेले, मात्र ते मृत झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

आरोग्यविषयक वृत्त

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !