PHOTO : खान्देशात दरोडेखोरांचा धुमाकूळ, भरदिवसा बँकेवर दरोडयाचा प्रयत्न, दरोडेखोरांच्या गोळीबारात बँक मॅनेजर ठार

रावेर : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेवर आज दुपारी भर दिवसा अज्ञात दोन हेल्मेटधारी दरोडेखोरांनी येत बँक मॅनेजरच्या छातीत गोळी झाडून पळ काढला. या थरार घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. गोळीबारात मृत्यू झालेल्या मॅनेजरचे नाव करण नेगे असल्याचे समजते. होंडा शाईन या दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी अवघ्या काही मिनिटातच हा दरोडा टाकून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे.

येथिल विजया बॅकेच्या शाखेवर सव्वादोन वाजेच्या सुमारास दोन हेल्मेटधारी चोरटयांनी सशस्त्र दरोडा टाकला, यावेळी चोरटयांना बँक अधिकारी करण नेगे यांनी विरोध केला असता त्यांच्या छातीत बंदूकीच्या दोन गोळया झाडण्यात आल्या. उर्वरित कर्मचाऱ्यांनी यावेळी सायरन वाजवल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

सायरन आवाज ऐकून मसाकाचे व्हा. चेअरमन भागवत पाटील, मोहन पाटील, पं.स. सदस्य जितु पाटील यांनी बॅकेकडे धाव घेत मॅनेजर करण नेगे यांना उचलून रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेतांना वाटेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली, घटनास्थळी निभोरा पो.स्टे. चे सपोनि प्रकाश वानखेडे त्यांच्या सहकाऱ्यासोबत बँकेत दाखल झाले. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

पालकभाजी आरोग्यासाठी फायदेशीर

You might also like