Bank Rules | SBI, HDFC, ICICI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! 30 सप्टेंबरला बंद होणार आहे ही सुविधा; जाणून घ्या

नवी दिल्ली : Bank Rules | SBI, HDFC बँक, ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) सिनियर सिटीजन्सला स्पेशल FDची ऑफर देत आहेत, जी 30 सप्टेंबर 2021 ला बंद होत आहे. बँकेने सिनियर सिटीजन्ससाठी मे 2020 आणलेल्या ऑफरमध्ये सिलेक्टेड मॅच्युरिटी पीरियड एफडी (Fixed Deposit) मध्ये सिनियर सिटीजन्सला लागू व्याजदरावर 0.50 टक्के जास्त व्याज देत (Bank Rules) आहे.

बँकांची ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी विशेष एफडी योजना आहे. या योजनेला तीनवेळा मुदतवाढ दिली आहे, आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. आता पुन्हा वाढ मिळण्याची शक्यता कमी आहे.

SBI :

SBI मध्ये सध्या ज्येष्ठ नागरिक स्पेशल एफडी योजनेत 6.20% व्याज मिळते. ही योजना 5 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आहे.

HDFC Bank :

एचडीएफसी बँक सिनियर सिटीजन केयरमध्ये 0.75 टक्के जास्त व्याज देते. यामध्ये एकुण व्याजदर 6.25% आहे.

बँक ऑफ बडोदा (BoB) :

बँक ऑफ बडोदाच्या विशेष एफडी योजनेत (5 वर्ष ते 10 वर्ष) ज्येष्ठ नागरिकांना व्याजदर 6.25 टक्के आहे.

ICICI Bank :

ICICI बँकेने वरिष्ठ नागरिकांसाठी स्पेशल एफडी स्कीम आयसीआयसीआय बँक गोल्डन ईयर्स (ICICI Bank Golden Years) स्कीममध्ये 0.80 टक्के जास्त व्याज ऑफर करत आहे. म्हणजे वार्षिक 6.30 टक्के व्याज देत आहे.

हे देखील वाचा

Narayan Rane | नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात दाखल

Pune Metro | लष्कराच्या प्रशिक्षणादरम्यान मेट्रो शेडवर झाला गोळीबार, मेट्रोचा कर्मचारी जखमी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Bank Rules | sbi bob icici hdfc bank senior citizens special fd scheme ends on 30 september 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update