SBI कडून लवकरच ATM कम डेबिट कार्ड बंद, चेअरमन रजनीश कुमारांचे संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय लवकरच नवीन निर्णय घेणार असून त्यांची हि योजना यशस्वी झाली तर देशभरातून लवकरच प्लॅस्टिकचे डेबिट कार्ड नष्ट होणार असून डिजिटल पद्धतीनेच व्यवहार केले जाणार आहेत. यासाठी बँक अभ्यास आणि संशोधन करत असून जर हि योजना यशस्वी झाली तर डिजिटल युगातील हि नवीन क्रांती असणार आहे.

90 कोटींपेक्षा जास्त डेबिट कार्ड
स्टेट बँकेचे चेयरमन रजनीश कुमार यांनी मुंबईत याविषयी माहिती देताना सांगितले कि, आम्ही डेबिट कार्ड हि संकल्पना बंद करण्यावर काम करत असून आम्हाला आशा आहे कि, आम्ही यामध्ये यशस्वी होऊ. त्यांनी सांगितले कि, संपूर्ण देशभरात 90 कोटी डेबिट कार्ड असून तीन कोटी क्रेडिट कार्ड आहेत. त्यामुळे आम्ही डेबिट कार्ड मुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहोत.

10 लाख योनो कॅश पॉईंट बनविणार
रजनीश कुमार यांनी सांगितले कि, या योनो पॉइंट्सद्वारे तुम्ही एटीएममधून पैसे काढणे किंवा दुकानातून सामान खरेदी करण्यासारखी कामे करू शकता. त्याचबरोबर याआधी बँकेने अशा 68,000 योनो कॅशपॉईंटची स्थापना केली असून आणखी 10 लाख पॉइंट्सची स्थापना करण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –