Bank Scam | देशात आणखी एक मोठा बँकिंग घोटाळा, मुंबईसह १६ ठिकाणी छापेमारी, ४००० कोटींच्या फ्रॉडमध्ये CBI ने दाखल केला FIR

नवी दिल्ली : Bank Scam | केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने कोलकाता येथील कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि तिच्या संचालकांविरुद्ध ४,००० कोटी रुपयांच्या बँक फसवणूक (Bank Fraud) प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे. ज्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये कंपनीचे प्रमोटर्स किंवा डायरेक्टर, अज्ञात सरकारी कर्मचारी आणि इतर काही जणांचा समावेश असून त्यांच्यावर सुमारे ४०३७.८७ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या (Bank Scam) आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २० बँकांच्या कन्सोर्टियमसोबत बँक फ्रॉड करण्यात आला आहे.

१६ ठिकाणी छापे टाकले
सीबीआयने मुंबई, नागपूर, कोलकाता, रांची, दुर्गापूर, विशाखापट्टणम आणि गाझियाबाद येथील १६ ठिकाणी छापे टाकले आहेत. एफआयआरमध्ये अभिजीत ग्रुपचे चेअरमन मनोज जयस्वाल, मॅनेqजग डायरेक्टर अभिषेक अग्रवाल आणि इतरांचा समावेश आहे.

असाही आरोप करण्यात आला आहे की, २००९ ते २०१३ या कालावधीत कथित कर्जदाराने खोटे प्रोजेक्ट स्टॉक स्टेटमेंट सादर करून बँकेचा फंड डायव्हर्ट केला होता. असाही आरोप आहे की, पार्टी आणि फंडशी संबंधी ट्रांजक्शनला अनेक कंपन्यांना डायव्हर्ट करण्यात आले. जे डमी अकाउंट होते. सीबीआयच्या प्रवक्त्याने एक निवेदनात म्हटले की, असे करून कर्जदाराने फंडचा चुकीचा गैरवापर केला आहे. (Bank Scam)

आणखी एक बँक फ्रोड उघड
तर दुसरीकडे, सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत (PNB) मेहुल चोक्सी-नीरव मोदीसारखा आणखी एक
घोटाळा समोर आला आहे. ३४ बनावट बँक गॅरंटीद्वारे १६८.५९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी CBI ने
एका PNB अधिकाऱ्याविरुद्ध FIR नोंदवली आहे. या बँक अधिकाऱ्याला आता निलंबित करण्यात आले आहे.
मेहुल चोक्सी-नीरव मोदी जोडीच्या कथित लेटर ऑफ क्रेडिट किंवा गॅरंटी (एलओयू) घोटाळ्यानंतर सुमारे चार
वर्षांनंतर असेच प्रकरण समोर आले आहे.

Advt.

Web Title :-Bank Scam | bank fraud of more than four thousand crore cbi takes action

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sania Mirza Divorce | अखेर पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमर हिने शोएब मलिक सोबतच्या ‘त्या’ फोटो बद्दल केला खुलासा

Ram Kadam | …तोपर्यंत मी माझे केस कापणार नाही – राम कदमांची प्रतिज्ञा