Bank Scams In India | देशात सर्वाधिक बँक घोटाळे महाराष्ट्रात; रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून माहिती उघड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Scams In India | गेल्या अनेक वर्षांपासून बँक घोटाळे होत आहेत यात कोट्यवधींची रक्कम लाटल्याचेही आपण पाहिले आहे. मात्र गेल्या सात वर्षात बँक घोटाळ्यातील (Bank Scams In India) रक्कम कमी होत असली तरी या घोटाळ्यांमुळे देशाला दररोज 100 कोटी रुपये गमवावे लागत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बँकांमध्ये (Banks in Maharashtra) सर्वाधिक घोटाळे झाले असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) आकडेवारीतून समोर आली आहे.

 

बँक घोटाळ्यात जेवढे पैसे अडकले आहेत त्यातील 50 टक्के पैसे हे महाराष्ट्रातील बँक शाखांतील आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (Delhi), तेलंगणा (Telangana), गुजरात (Gujarat) आणि तामिळनाडू (Tamil Nadu) या राज्यांचा नंबर लागतो. बँक घोटाळ्यात या पाच राज्यांचे मिळून दोन लाख कोटी अडकल्याचे समोर आले आहे. देशातील एकूण बँक घोटाळ्याचा विचार केला तर तुलनेत हे प्रमाण 83 टक्के आहे. एप्रिल 2015 पासून ते डिसेंबर 2021 या कालावधीत देशात 2.5 लाख कोटी रुपयांचे बँक घोटाळे उघडकीस आले आहेत. वाढत्या बँक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी घोटाळ्यातील रक्कम कमी कमी होत असल्याचे वित्त मंत्रालयाने (Ministry of Finance) म्हंटले आहे. (Bank Scams In India)

 

घोटाळ्याचे अनेक मार्ग –
बँक घोटाळ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. घोटाळ्यासाठी अनेक प्रकार अवलंबले जात आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने या घोटाळ्यांची 8 प्रकारात विभागणी केली आहे. त्यात बनावट साधने वापरणे, खात्यात फेरफार करणे, खोटी खाती तयार करणे, मालमत्तांचे रुपांतरण, अवैध कर्ज सुविधा, अवैध वरदहस्त, हलगर्जीपणा, फसवणूक, बनावट दस्तावेज, विदेशी चलन व्यवहारांतील अनियमितता आदी मार्गांचा समावेश केला आहे.

 

असे बुडाले पैसे –

2015 – 16 – 67,760 कोटी रुपये

2016 – 17 – 59,966,4 कोटी रुपये

2019 – 20 – 27,698,4 कोटी रुपये

2020 – 21 – 10,699,9 कोटी रुपये

2021 – 22 – 647,9 कोटी रुपये

 

Web Title :-Bank Scams In India | most bank scams in maharashtra bank scams in india

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा