Bank Strike | ‘या’ तारखेला देशभरातील बँकांचा संप, ATM सह इतर सेवांवरही परिणाम होऊ शकतो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमचे पुढील आठवड्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण, पुढील आठवड्यात बँक कर्मचारी संपावर (Bank Strike) जाणार असल्याने बँकिंग सेवेवर (Banking Services) परिणाम होणार आहे. बँक कर्मचारी 19 नोव्हेंबर 2022 रोजी संपावर (Bank Strike) जाणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (All India Bank Employees Association) एक दिवसीय संप पुकारला आहे.

बँक ऑफ बडोदाने दिली माहिती

संपामुळे एटीएमसह (ATM) सर्व बँकिंग सेवांवर या दिवशी परिणाम होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने स्टॉक एक्सचेंजला (Stock Exchange) पाठवलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे की, ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशनच्या जनरल सेक्रेटरींनी इंडियन बँक्स असोसिएशनला (Indian Banks Association) संपाची नोटीस दिली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, AIBEA च्या सदस्यांनी त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ 19 नोव्हेंबर 2022 रोजी संपावर (Bank Strike) जाण्याचा प्रस्ताव दिला आहे.

बँकेचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी…

संपाच्या दिवशी बँकेच्या शाखा आणि कार्यालयांमध्ये कामकाज सुरु ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत
असल्याचे बँकेने म्हटले आहे. मात्र, संप झाल्यास त्या दिवशी बँकिंग सेवा प्रभावित होऊ शकतात.

एटीएमवर होऊ शकतो परिणाम

शनिवारी संपामुळे कामकाज बंद राहणार असून, दुसऱ्या दिवशी रविवार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला
बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर ते या आठवड्यातच करा. कारण संपाच्या दुसऱ्या दिवशी
रविवार असल्याने सर्वसामान्यांना दोन दिवस एटीएममध्ये रोकड तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो.

Web Title :-  Bank Strike | bank strike on november 19 banking atm services may be hit know in detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adarsh Shinde | ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या उत्कर्षसाठी आदर्श शिंदेनी लिहिली पोस्ट, म्हणाला….

Maharashtra DCP / Addl SP / SP Transfers | बदली करण्यात आलेल्या 6 पोलीस अधिकाऱ्यांची नव्याने पदस्थापना; DCP नम्रता पाटील, श्वेता खेडकर, तिरुपती काकडे यांचा समावेश