संपामुळं सलग 5 दिवस बंद राहणार बँक आणि ATM, त्यापुर्वीच करून घ्या ‘कॅश’ची व्यवस्था

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या आठवड्यात, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला सलग दोन दिवस बँक संप केल्यानंतरही सरकारी बँकांचे कर्मचारी आता पुन्हा एकदा संप करण्याची शक्यता आहे. जर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी संप करण्यास सक्षम असतील तर मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात एटीएम आणि बँकिंग सेवेवर सलग ५ दिवस परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सामान्य माणसाला रोखीच्या अभावापासून बँकिंग सेवांपर्यंत अडचणी येऊ शकतात.

कधी होऊ शकतो संप
बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) च्या म्हणण्यानुसार 11 मार्च ते 13 मार्च दरम्यान सलग 3 दिवस बँक संप होऊ शकते. वास्तविक, बँक कर्मचाऱ्यांचा पगार वाढावा या मागणीसाठी इंडिया बँक असोसिएशनशी (आयबीए) बोलणी करण्यात यश आलेले नाही. तसेच , महिन्यातील दुसर्‍या शनिवारीच्या आधी हा संप होणार असल्याने समजते. रविवारीसह सलग ५ दिवस बँकिंग सेवा खंडित होऊ शकतात. प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी बँकांना सुट्टी असते. दरम्यान, या संपाचा आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या खाजगी बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता नाही.

१ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा
सरकारी बँकांमध्ये हा संप झाल्यास, या वर्षात तिसऱ्यांदा बँकिंग सेवांवर परिणाम होणार आहे. यापूर्वी 8 जानेवारी रोजी संघटनांनी सरकारच्या धोरणांवर भारत बंदची हाक दिली होती. बँक युनियननेही जाहीर केले की सरकारने त्यांची मागणी मान्य न केल्यास 1 एप्रिलपासून ते अनिश्चित संपावर जातील.

बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या
सरकारी बँक कर्मचार्‍यांची मागणी आहे की, प्रत्येक 5 वर्षानंतर त्यांच्या पगारामध्ये सुधारणा करावी. युनियनचे नेते आणि बँक व्यवस्थापन यांच्याशी झालेल्या अनेक बैठकीनंतर ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. बँक कर्मचार्‍यांच्या वेतनात अखेरची 2012 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. 2017 पासून त्यात सुधारणा करण्यात आली नाही. सोबतच शनिवारच्या सुट्टीलाही बँक संघटनांचा विरोध आहे. दरम्यान, भारतीय बँक असोसिएशनने 5 दिवसांच्या कार्यकारी आठवड्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. ते म्हणतात की भारतात आधीच सार्वजनिक सुटी अधिक आहे. अशा परिस्थितीत दर शनिवारी आणि रविवारी बँकेच्या सुट्टीमुळे सामान्य लोक अडचणीत येऊ शकतात.